Bank of Maharashtra Recruitment  Saam Tv
naukri-job-news

Bank Jobs: बँक ऑफ महाराष्ट्रात नोकरीची संधी; मिळणार पगार १,५६,५०० रुपये; अर्ज कसा करावा?

Bank of Maharashtra Recruitment 2025: बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. बँक ऑफ महाराष्ट्रात सध्या मॅनेजर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरीची संधी

मॅनेजर पदासाठी होणार भरती

पात्रता, अर्जप्रक्रिया कशी असणार?

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता तुम्हाला सरकारी बँकेत नोकरी करण्याची उत्तम संधी आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये सध्या भरती जाहीर करण्यात आली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. याबाबत बँकेने अधिकृत अधिसूचना जारी केली आहे.

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये डेप्युटी जनरल मॅनेजर, असिस्टंट जनरल मॅनेजर, चीफ मॅनेजर, सीनियर मॅनेजर अशा विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. १० सप्टेंबरपासून ही प्रोसेस सुरु झाली आहे. या नोकरीसाठी तुम्ही bankofmaharashtra.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०२५ आहे.

बँक ऑफ महाराष्ट्रमधील या भरती मोहिमेत इन्फॉर्मेशन अँड टेक्नोलॉजी/ डिजिटल बँकिंग / आयटी सिक्युरिटी/ आयएस ऑडिट / सीआयएसओ सेल / ट्रेजरी / इंटरनॅशनल बिझनेस / लीगल / क्रेडिट अशा विविध विभागात भरती केली जाणार आहे.

पात्रता

या नोकरीसाठी विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असणार आहे. डेप्युटी मॅनेजर आयटी स्केल VI पदासाठी बी.टेक / बी.ई कॉम्प्युटर सायन्स / इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी / एमसीए पदवी प्राप्त केलेली असावी. याचसोबत कामाचा अनुभव असावा. चीफ मॅनेजर (डेटा प्रोटेक्शन) साठी इन्फॉर्मेशन टेक्नेलॉजी / लॉ / डेटा प्रोटेक्शन / डेटा प्रायव्हसीमध्ये डिग्री प्राप्त केलेली असावी. सीनियर मॅनेजर पदासाठी लॉमध्ये बॅचलर डिग्री प्राप्त केलेली असावी. या नोकरीबाबत सविस्तर माहिती नोटिफिकेशनमध्ये दिलेली आहे.

पगार

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांना पदानुसार पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी ६४८३० ते १५६५०० रुपये पगार मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dilip Prabhavalkar: वयाच्या ८१ व्या वर्षी दिलीप प्रभावळकरांचे दमदार ॲक्शनसीन्स; 'दशावतार'मध्ये साकारली तब्बल ११ पात्र

Viral Video: एकमेकांची कॉलर पकडली अन् बेंचवर धरून आपटलं, भर वर्गात विद्यार्थ्यांसमोर शिक्षकांची तुफान हाणामारी

Jalna : बंजारा समाजाच्या मागणीला आदिवासी समाजाचा विरोध; जालन्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Kolhapuri chicken masala recipe: घरच्या घरी तयार करा झणझणीत कोल्हापूरी चिकन मसाला, रेसिपी लिहून ठेवा

Beed Crime : बीडमध्ये पत्नीकडून पतीला लाथाबुक्क्यांनी मारहाण, अवघड जागी मार लागल्याने पतीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT