Satara Tourism: आध्यात्मिक आणि निसर्गरम्य अनुभव हवा असेल तर साताऱ्यातील 'या' पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या

Surabhi Jayashree Jagdish

सज्जनगड

साताऱ्यात असलेला सज्जनगड हा एक ऐतिहासिक किल्ला आहे. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु समर्थ रामदास स्वामी यांच्या वास्तव्याने पावन झाला आहे.

समर्थ रामदास स्वामींची समाधी

डावरील सर्वात महत्त्वाचे ठिकाण म्हणजे समर्थ रामदास स्वामींची समाधी. हे एक पवित्र तीर्थक्षेत्र बनले आहे. समर्थांनी 'दासबोध' हा महान ग्रंथ याच गडावर लिहिला.

कास पठार

सज्जनगडपासून सुमारे 28 किलोमीटरवर असलेले हे पठार त्याच्या अनोख्या फुलांसाठी प्रसिद्ध आहे. ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात येथे हजारो प्रकारची फुले उमलतात

ठोसेघर धबधबा

सज्जनगडपासून सुमारे 36 किलोमीटरवर असलेले ठोसेघर हे उंच आणि भव्य धबधब्यांसाठी ओळखले जाते. पावसाळ्यात या धबधब्यांचे सौंदर्य पाहण्यासारखे असते.

चाळकेवाडी पवनचक्की प्रकल्प

ठोसेघर धबधब्याच्या जवळच हा मोठा पवनचक्की प्रकल्प आहे. हजारो पवनचक्क्यांनी भरलेला हा परिसर एक वेगळाच अनुभव देतो.

अजिंक्यतारा किल्ला

साताऱ्याच्या अगदी जवळ असलेला हा किल्ला मराठा साम्राज्याच्या इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग आहे.

उरमोडी धरण

सज्जनगडाच्या पायथ्याशी असलेले हे धरण पावसाळ्यात पूर्ण भरल्यावर खूप सुंदर दिसते. शांत वातावरण आणि पाण्याचे नयनरम्य दृश्य इथली खास ओळख आहे.

सर्वाधिक शिकलेला मुघल बादशाह कोण होता?

येथे क्लिक करा