बँक ऑफ बडोदामध्ये विविध पदांसाठी भरती सुरु आहे. बँक ऑफ बडोदामध्ये ६२७ जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. स्पेशलिस्ट ऑफिसर या पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या पदांसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ जुलै २०२४ आहे.
बँक ऑफ बडोदामध्ये स्पेशलिस्ट ऑफिसरसाठी पदभरती जाहीर केली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २ जुलै होती. मात्र, आता ही तारीख वाढवण्यात आली आहे. या भरतीमध्ये रिलेशनशिप मॅनेजर, क्रेडिट अॅनॅलिस्ट, सिनियर मॅनेजर या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाइन पद्धतीने तुम्ही अर्ज करु शकतात.
बँक ऑफ बडोदा भरतीसाठी अर्ज कसा करायचा?
बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीसाठी अर्ज करायचा असल्यास सर्वप्रथम https://www.bankofbaroda.in/ या वेबसाइटला भेट द्या. त्यानंतर करिअर या टॅबवर क्लिक करा. तिथे तुम्हाला current openings हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. यामध्ये तुम्हाला स्पेशलिस्ट ऑफिसर भरती अशी लिंक दिसेल. त्यावर क्लिक करुन तुम्ही अर्ज करु शकतात. यानंतर तुम्ही फॉर्ममध्ये आवश्यक माहिती भरा. हा फॉर्म डाउनलोड करा आणि अर्जाची प्रिंट काढा.
बँक ऑफ बडोदामध्ये अर्ज करण्यासाठी तुम्हाला शुल्क भरावे लागणार आहे. सामान्य, ओबीसी आणि EWS प्रवर्गातील उमेदवारांना ६०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. तर SC,ST,PWD, महिलांना १०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. याबाबत अधिक माहिती बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.