Bank Jobs Saam Tv
naukri-job-news

Bank Jobs: बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची संधी; १२७६ रिक्त जागा; पात्रता काय? अर्ज कसा करावा?

Bank Of Baroda Recruitment: बँक ऑफ बडोदामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. मॅनेजर, ऑफिसर पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. १२७६ रिक्त पदांवर ही भरती करण्यात येणार आहे.

Siddhi Hande

बँकेत नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. तुम्हालाही बँकेत नोकरी करायची असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. बँक ऑफ बडोदामध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. बँक ऑफ बडोदाने १२६७ रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे.या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत. (Bank Of Baroda Recruitment)

या नोकरीबाबत सविस्तर माहिती bankofbaroda.in या वेबसाइटवर देण्यात आली आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षा, ग्रुप डिस्कशन आणि मुलाखतीद्वारे होणार आहे.या नोकरीसाठी तुम्हाला आयबीपीएसच्या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत. (Bank Of Baroda Recruitment)

नोकरीसाठी अर्ज कसा करावा?

या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला बँक ऑफ बडोदाच्या स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी रजिस्ट्रेशन करावे लागेल.

यासाठी तुम्हाला bankofbaroda.in या वेबसाइटवर जावे लागेल. त्यानंतर करिअर टॅबवर क्लिक करा.

यानंतर Current Openings टॅबवर क्लिक करा.

यानंतर Recruitment of professionals on a regular basis on various departments वर क्लिक करा.

त्यानंतर रजिस्टर करा आणि अर्ज भरा.

यानंतर अर्ज शुल्क भरुन तुम्ही फॉर्म सबमिट करा.

मार्केटिंग ऑफिसर, सेल्स मॅनेजर, सिनियर मॅनेजर, क्रेडिट अॅनालिस्ट मॅनेजर,सिक्युरिटी अॅनालिस्ट ऑफिसर, सिक्युरिटी अॅनालिस्ट मॅनेजर, टेक्निकल ऑफिसर, सिव्हिल इंजिनियर पदासाठी ही भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी संबंधित क्षेत्रात पदवी प्राप्त केलेली असावी. २१ ते ३७ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPS Anjana Krushna: IPS अंजना कृष्णा याचं काय चुकलं? ठाकरेंच्या नेत्याचा अजित पवारांना सवाल

Red Fort History: ऐतिहासिक लाल किल्ल्याचे बांधकाम किती दिवसांमध्ये पूर्ण झाले?

Pitru Paksha 2025 : पितृंचे तर्पण करताना लक्षात ठेवा हे नियम

'ही शान कुणाची, लालबागच्या राजाची!' मंडपाबाहेर येताच देशभक्तीवर गाणं वाजलं, भाविकांच्या अंगावर काटा अन् डोळ्यात अश्रू

Akshay Kumar: अक्षय कुमारचा दिलदारपणा; पूरग्रस्तांना केली ५ कोटींची मदत, म्हणाला 'ही माझी...

SCROLL FOR NEXT