Bank Of Baroda Job Saam Tv
naukri-job-news

Bank Of Baroda Job: १०वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी; बँक ऑफ बडोदात निघाली भरती; पगार ३७००० रुपये; आजच अर्ज करा

Bank Of Baroda Recruitment 2025: बँक ऑफ बडोदामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. बँक ऑफ बडोदात सध्या ऑफिस असिस्टंट पदासाठी भरती सुरु आहे.

Siddhi Hande

बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. बँक ऑफ बडोदामध्ये १०वी पास तरुणांसाठी नोकरी करण्याची उत्तम संधी आहे. ऑफिस असिस्टंट पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

बँक ऑफ बडोदामधील या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. तुम्हाला bankofbaroda.in वर जाऊन अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया ३ मेपासून सुरु झाली आहे.

बँक ऑफ बडोदामधील (Bank Of Baroda)या भरतीमध्ये ५०० जागा रिक्त रिक्त आहेत.या पदांसाठी तुम्ही अर्ज करु शकतात.या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ मे २०२५ आहे. इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

बँक ऑफ बडोदामधील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून १०वी पास असणे गरजेचे आहे. तसेच ते उमेदवार ज्या ठिकाणी राहतात त्या प्रदेशाची भाषा त्यांना लिहता आणि बोलता यायला हवी.

बँक ऑफ बडोदात भरती (Bank Of Baroda Bharti)

बँक ऑफ बडोदामधील नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा १८ ते २६ वर्षे असावी.१ मे १९९९ ते १ मे २००७ या कालावधीत जन्म झालेले उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.

बँक ऑफ बडोदामधील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ६०० रुपये शुल्क भरायचे आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना १०० रुपये शुल्क भरायचे आहेत. या नोकरीबाबत अधिसूचना बँकेच्या वेबसाइटवर देण्यात आली आहे.

बँक ऑफ बडोदामधील या नोकरीसाठी उमेदवारांची निवड ही ऑनलाइन परीक्षा आणि लोकल लँग्वेज एफिशियंशी ही परीक्षा पास केल्यानंतर केली जाणार आहे. जे उमेदवार ऑनलाइन परीक्षा पास करणार तेच लोक ही परीक्षा देऊ शकणार आहेत. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ३७००० रुपये पगार मिळणार आहे.वेगवेगळ्या राज्यांमध्ये ही भरती केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रामदास आठवले यांनी पैठण तालुक्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी

Navratri Remedies: नवरात्रीत सुपारीच्या पानांचा करा खास उपाय, मिळेल नोकरी व व्यवसायात यश

Today Gold Rate: नवरात्रीत सोन्याला पुन्हा झळाली; १० तोळ्यामागे ३००० रुपयांची वाढ; वाचा आजचे दर

Bigg Boss 19: नेहलची री-एन्ट्री, तान्याची पोलखोल, फरहाना - गौरवची कॅप्टनशिपसाठी भांडण; काय घडलं बिग बॉसच्या घरात

GK: एक ट्रेन चालवण्यासाठी किती खर्च येतो? जाणून घ्या सर्व माहिती

SCROLL FOR NEXT