बँकेत नोकरी करायची इच्छा असणाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती आहे. बँक ऑफ बडोदामध्ये भरती सुरु आहे. जवळपास ६२७ रिक्त जागांसाठी ही भरती करण्यात येत आहे. बँक ऑफ इंडिया ही भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. या बँकेत काम करायचे असेल तर लवकरात लवकर अर्ज करा. या भरतीची जाहिरात बँक ऑफ बडोदाच्या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीसाठी तुम्ही ऑनलाइन अर्ज करु शकतात.
बँकेत विविध जागांसाठी भरती सुरु आहे. या भरतीसाठी पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. या भरतीसाठी २२ ते ४५ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या जागांसाठी पदवी प्राप्त, पदवीधर, B.E,B.Tech,BCA उत्तीर्ण उमेदवार अर्ज करु शकतात. या भरतीमध्ये सहाय्यक उपाध्यक्ष MSME, वरिष्ठ व्यवस्थापक MSME, वरिष्ठ संबंध व्यवस्थापक (Senior Relationship Manager), ई- वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर, बँकर, संरक्षण बँकिंग सल्लागार, क्रेडिट विश्लेषक, संबंध व्यवस्थापक या पदांसाठी अर्ज करता येणार आहेत.
या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी सामान्य, EWS, OBC प्रवर्गातील उमेदवारांना ६०० रुपये शुल्क भरावे लागणार आहेत. तर SC,ST, PwS आणि महिला प्रवर्गातील उमेदवारांना १०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. या नोकरीसाठी पात्र उमेदवारांना भारतात कुठेही काम करण्यास लागू शकते. त्यामुळे भारतात कुठेही काम करण्याची तयारी असलेल्या उमेदवारांनी अर्ज करावा. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २ जुलै २०२४ आहे. या नोकरीसाठी तुम्हाला बँकेच्या वेबसाइटवर जाऊन अर्ज भरावा लागेल. अधिक माहितीसाठी तुम्ही बँकेची अधिकृत वेबसाइट चेक करा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.