UCO Bank Job Saam Tv
naukri-job-news

UCO Bank Jobs: युको बँकेत नोकरीची संधी; २५० रिक्त जागा; अर्ज कसा करावा?

UCO Bank Recruitment 2025: युको बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. युको बँकेत २५० रिक्त पदांवर भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत.

Siddhi Hande

बँकेत नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे.युको बँकेत सध्या विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. युको बँकेत लोकल बँक ऑफिसर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. (UCO Bank Recruitment)

युको बँकेत तब्बल २५० रिक्त पदांवर ही भरती करण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. ucobank.com या वेबसाइटवर सर्व माहिती देण्यात आली आहे. (UCO Bank job)

युको बँकेतील या भरती मोहिमेत तुम्ही ५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करु शकतात. ही भरती विविध राज्यांमध्ये केली जाणार आहे. गुजरातमध्ये ५७ पदे भरती केली जाणार आहे. महाराष्ट्रात ७० पदे भरती केली जाणार आहे. आसासममध्ये ३० पदांसाठी रिक्त जागा आहे. कर्नाटकमध्ये ३५ जागा तर त्रिपुरामध्ये १३ जागांवर ही भरती केली जाणार आहे.जम्मू काश्मीरमध्ये ५ रिक्त पदे आहे.

युको बँकेतील या भरती मोहिमेत अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असावे. याचसोबत मार्कशीट किंवा डिग्री सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे.

युको बँकेतील या भरती मोहिमेत २० ते ३० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ८५० रुपये शुल्क भरायचे आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना १७५ रुपये अर्ज शुल्क भरायचे आहे.

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे केली जाणार आहे. तुमची रिजनिंग आणि कॉम्प्युटर अॅप्टीट्यूड टेस्ट घेतली जाणार आहे. त्यानंतर तुमची निवड केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange : हत्येची सुपारी देणारा नेता कोण? जरागें पाटील करणार मोठा गोप्यस्फोट

Maharashtra Live News Update: खगोलशास्त्रातील आणखी एक तारा हरपला

Ajit Pawar News : अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे एक पाऊल पुढे, भाजप-शिवसेनेच्या आधी जाहीर केला उमेदवार

Maharashtra winter : महाराष्ट्राचा पारा घसरला, गुलाबी थंडी कधी येणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज काय सांगतो

Spiritual benefits: कार्तिक मासातील पवित्र एकादशी; आरोग्य, कामकाज आणि नात्यांवर कसा होईल प्रभाव?

SCROLL FOR NEXT