Bank Jobs Saam Tv
naukri-job-news

Bank Jobs: शिक्षण पूर्ण झालंय अन् नोकरी शोधताय? या बँकेत सुरु आहे भरती; ७५० रिक्त जागा; अशा पद्धतीने करा अर्ज

Indian Overseas Bank Recruitment: इंडियन ओव्हसीज बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. इंडियन ओव्हरसीज बँकेत अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची अनेकांची इच्छा असतात. जर तुम्हालाही बँकेत काम करायचे असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी इंडियन ओव्हरसीज बँकेत सध्या अप्रेंटिस पदासाठी भरती सुरु आहे. अप्रेंटिस पदासाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे नुकतेच शिक्षण पूर्ण झालेल्या तरुणांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

इंडियन ओव्हरसीज बँकेतील या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ मार्च २०२५ आहे. तुम्ही iob.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. (Bank Jobs)

इंडियन ओव्हरसीज बँकेतील या भरती मोहिमेत ७५० पदे भरली जाणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. इंडियन ओव्हरसीज बँकेतील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी प्राप्त केलेली असावी.

इंडियन ओव्हरसीज बँकेतील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २० ते २८ असावे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. (Indian Overseas Bank Recruitment)

इंडियन ओव्हरसीज बँकेतील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ९४४ रुपये शुल्क भरायचे आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ७०८ रुपये शुल्क भरायचे आहे.दिव्यांग उमेदवारांना ४७२ रुपये शुल्क भरायचे आहे.

या नोकरीसाठी उमेदवारांना ऑनलाइन रिटेन टेस्ट द्यावी लागणार आहे. ही टेस्ट एमसीक्यू असणार आहे. यामध्ये १०० प्रश्न विचारले जातील. या परीक्षेत पास झाल्यानंतरच उमेदवारांची निवड केली जाईल.

या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना स्टायपेंड मिळणार आहे. मेट्रो शहरात १५,००० रुपये, शहरी भागात १२,००० रुपये तर ग्रामीण भागात १०,००० रुपये स्टायपेंड दिली जाणार आहे.

अर्ज कसा करावा?

या नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवारांना इंडियन ओव्हरसीज बँकेच्या वेबसाइटवर जायचे आहे. त्यानंतर Career या ऑप्शनवर क्लिक करा. यानंतर तुम्हाला अर्ज करायचा आहे. त्याचसोबत शुल्कदेखील जमा करायचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Balushahi Recipe: सणासुदीला झटपट बनवा खुसखुशीत आणि पाकात मुरलेली बालूशाही, वाचा रेसिपी

Tomatoes for heart health: हृदयाच्या आरोग्यासाठी टोमॅटो फायदेशीर; पण कच्चा खावा की शिजवून? कार्डिओलॉजिस्टने दिलं उत्तर

Pitru Paksha 2026: श्राद्ध कसं करायचं? पितृ पक्षात कोणते विधी केले जातात? वाचा...

Maharashtra News Live Update: साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण, चौकशी समितीने आणखी 8 आठवड्यांची मुदत मागितली

मनोज जरांगेंना मोठा झटका! निकटवर्तीयावर ४.९० कोटींचा दंड कायम

SCROLL FOR NEXT