Bank Jobs Saam Tv
naukri-job-news

Bank Jobs: परिक्षेशिवाय मिळणार सरकारी नोकरी; बँक ऑफ बडोदामध्ये भरती सुरु; अर्ज कसा करावा?

Bank Of Baroda Recruitment 2024: बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. बिझनेस कॉरेस्पॉडंट कोऑर्डिनेटर पदासाठी भरती करण्यात येणार आहे.

Siddhi Hande

बँकेत नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. जर तुम्हालाही बँकेत नोकरी करायची असेल तर ही माहिती खास तुमच्यासाठी. बँक ऑफ बडोदामध्ये सध्या विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत.

बँक ऑफ बडोदामध्ये बिझनेस कॉरेस्पॉडंट कोऑर्डिनेटर पदासाठी भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.इच्छुक उमेदवारांनी बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत. (Bank Jobs)

बँक ऑफ बडोदाच्या या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या नोकरीसाठ अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ नोव्हेंबर २०२४ आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ही चांगली संधी आहे.

बँक ऑफ बडोदामधील या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असावे. त्याचसोबत एमएससी (आयटी)/बीई (आयटी)/एमसीए / एमबीए पदवी प्राप्त केलेली असावी.(Bank Of Baroda Job)

बँक ऑफ बडोदामधील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा २१ ते ४५ असावी.या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना १५००० रुपये पगार मिळणार आहे.

या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्जासह कागदपत्रे बँक ऑफ बडोदा, क्षेत्रीय कार्यालय, जीवन प्रकाश, जीवन वीमा मार्ग, पंडरी, रायपुर (सीजी)-४९२००४ येथे अर्ज पाठवायचा आहे. (Bank of Baroda Recruitment 2024)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: मोठी बातमी! व्हिएतनाममध्ये भारतीय पर्यटकांची बोट उलटली, १५ जणांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: मोशी कचरा डेपो इमारत दुर्घटना प्रकरणात मृतांचा आकडा आता पोहोचला चारवर

नगरसेवक, नेते नव्हे तर अख्खा पक्षच भाजपमध्ये विलीन; राजकारणात खळबळ

Mumbai : मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली! पाणी पुरवठा करणाऱ्या महत्त्वाच्या २ धरणांच्या पातळीत वाढ

डोंबिवलीमध्ये मोठा घोटाळा उघड! जिल्हा परिषदेचा खोटा शिक्का वापरून इमारत ‘कायदेशीर’ दाखवली

SCROLL FOR NEXT