MTDC Recruitment: ८वी पास तरुणांसाठी नोकरीची संधी;MTDC मध्ये भरती सुरु;जाणून घ्या सविस्तर

MTDC Recruitment 2024: महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. टुरिझम गाइड पदासाठी ही भरती केली जाणार आहे.
MTDC Recruitment
MTDC RecruitmentSaamTv
Published On

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळात सध्या नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. एमटीडीसी रिसॉर्ट्स डेस्टिनेशन टुरिस्ट गाइड प्रोग्राम २०२४-२५ अंतर्गत ही भरती करण्यात येणार आहे.१०वी आणि १२वी पास तरुणांसाठी ही नोकरीची सुवर्णसंधी आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे ही जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

एमटीडीसी मुंबईकडून जाहिरात अधिकृतपणे प्रकाशित करण्यात आली आहे. या नोकरीसाठी ८वी, १०वी आणि १२वी पास उमेदवार अर्ज करु शकतात.

MTDC Recruitment
Government Job: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; महिना १२५००० रुपये पगार; पात्रता काय? जाणून घ्या

२१ ते ३५ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. ऑनलाइन ई-मेलच्या माध्यमातून हे अर्ज मागवण्यात आले आहे. एमटीडीसी रिसॉर्ट्स डेस्टिनेशन टुरिस्ट गाइड पदासाठी ही भरती केली जाणार आहे.

या नोकरीसाठी ८, १०वी आणि १२वी पास असणे गरजेचे आहे. त्याचसोबत उमेदवाराला मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषा बोलता यायला हवी. या नोकरीसाठीचे ठिकाण मुंबई आहे.या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारासला प्रवास करण्याची आवश्यकता भासू शकते. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवाराला वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

MTDC Recruitment
Government job: १०वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; तब्बल ३८८३ रिक्त पदांसाठी भरती; अशा प्रकारे करा अर्ज

एमटीडीसीमधील या नोकरीसाठी अर्ज करताना अर्जासोबत उमेदवाराचे नाव, टेलीफोन नंबर हे सर्व ई-मेलवर पाठवायचे आहे. १५ नोव्हेंबर २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी resortguide@maharashtratourismgov.in या मेल आयडीवर जाऊन मेल करायचा आहे.

MTDC Recruitment
Government Job: १०वी, १२वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी; ONGC मध्ये भरती सुरु; पगार किती? जाणून घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com