शिक्षण पूर्ण झालंय अन् तुम्ही नोकरी शोधत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये स्केल II, III, IV, V, VI आणि VII अंतर्गत स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. तुम्ही bankofmaharashtra.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. (Bank of Maharashtra Recruitment)
बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये १७२ पदांसाठी भरती सुरु आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये जनरल मॅनेजर, डेप्युटी जनरल मॅनेजर, असिस्टंट जनरल मॅनेजर, सिनियर मॅनेजर या पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ फेब्रुवारी २०२५ आहे.
बँक ऑफ महाराष्ट्रमधील वेगवेगळ्या विभागांमध्ये ही भरती केली जाणार आहे. त्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रात पदवीधर उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. त्यासाठी तुम्ही अधिकृत नोटिफिकेशन चेक करा.
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २२ ते ५५ वर्षे असणे गरजेचे आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. इंटरव्ह्यूमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांटी निवड केली जाणार आहे. या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी एकदा अधिकृत नोटिफिकेशन वाचा. (Bank of Maharashtra Job)
या नोकरीसाठी स्केल II पदासाठी ६४८२० ते ९३९६० रुपये पगार मिळणार आहे. स्केल III पदासाठी 85920- 105280 पगार मिळणार आहे. स्केल IV पदासाठी 102300- 120940 पगार मिळणार आहे. स्केल VII साठी 156500- 173860 पगार मिळणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.