Indian Bank Recruitment Saam Tv
naukri-job-news

Bank Job: इंडियन बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; या पदासाठी भरती सुरु, पगार किती? जाणून घ्या

Indian Bank Recruitment: तरुणांकडे बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. इंडियन बँकेत सध्या भरती सुरु आहे.

Siddhi Hande

बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बँकेत सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. इंडियन बँकेत फायनान्शियल लिटरसी काउंसलर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. (Indian Bank Recruitment)

इंडियन बँकेतील या नोकरीबाबत अधिसूचना अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी सर्वप्रथम अधिसूचना वाचावी. त्यानंतर अप्लाय करावे. या नोकरीसाठी तुम्हाला indianbank.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. (Bank jobs)

इंडियन बँकेतील या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२४ आहे. इच्छुक उमेदवारांनी मुदतीपूर्वी अर्ज करावेत.

बँकेत फायनान्शियल लिटरसी काउंसलर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ६८ वर्ष आहे. या नोकरीसाठी निवृत्त बँक ऑफिसर, आरबीआय, नाबार्ड किंवा सीडबीमधून निवृत्त झालेले असावे. तसेच ५ वर्षांचा अनुभव असायला हवा. उमेदवाराला त्याच्या प्रदेशातील भाषा आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे गरजेचे आहे. (Indian Bank Recruitment)

याचसोबत एमएस ऑफिस, टायपिंगचे ज्ञान असायला हवे. उमेदवाराकडे ड्रायव्हिंग लायसन्स असायला हवे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना १८००० रुपये पगार मिळणार आहे.या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

इंडियन बँकेतील ही भरती कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर केली जाणार आहे.या नोकरीसाठी उमेदवारांनी अर्ज द झोनल मॅनेजर, इंडियन बँक, RS 66/4A ECR Road,पुदुच्चेरी येथे पाठवायचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

today horoscope: आज तुम्हाला अचानक… राशीत काय? चांगलं की वाईट?

Raj Thackeray: मतभेदांपेक्षा महाराष्ट्र महत्वाचा; भर सभेत राज ठाकरे यांची भावनिक साद

kiwi Benefits: किवी फळाचे असंख्य फायदे!

VIDEO : पावसात सभा झाल्यावर निवडून येतात; भाषणावेळी पाऊस आला, फडणवीसांचा शरद पवारांना टोला

Champions Trophy: टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जाण्यास नकार का दिलाय? समोर आलं खरं कारण

SCROLL FOR NEXT