Apple SAAM TV
naukri-job-news

Apple : ॲपल कंपनी देतेय 6 लाख देशवासीयांना नोकरीची संधी...

Recruitment News : देशात ॲपल ब्रँड खूप चालतोय. प्रत्येक जण आपल्या आयुष्यातले धैर्य ठरवताना एखादं ॲपलचं उत्पादन विकत घेऊ असं ठरवायला लागले आहेत. ही कंपनी आता लोकप्रिय झाली आहे. या कंपनीने नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे.

Shreya Maskar

ॲपल (Apple) ही एक अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनी आहे. सध्याच्या डिजीटल युगात ॲपल ब्रँड खूप चालतोय. हा ब्रँड इतका चालण्याचं मुख्य कारण म्हणजे कंपनीच्या जाहीरातींची रणनीती. कंपनी किती लोकांपर्यत पोहोचते? कंपनीची उत्पादनं किती लोकांना माहित आहेत? हे काम कंपनीचे कर्मचारी करत असतात. त्यामुळे कर्मचार्यांची संख्या कंपनीला जास्त प्रमाणात लागते.

२०२० मध्ये केंद्राने पी एल आय ही योजना आणली. ही योजना स्मार्टफोनशी संबधीत आहे. तेव्हा ॲपलने १,६५,००० इतक्या मोठ्यासंख्येसाठी नोकऱ्यांची सोय केली होती. तसचं या वर्षाच्या अखेर पर्यंत सहा लाख नविन रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या जाण्याचा अंदाज जागतिक स्मार्टफोन निर्माती कंपनी 'ॲपल' केला आहे. यामुळे चिनी उत्पादनांचा वापर कमी होण्याची शक्यता आहे. हा प्रयत्न भारतासाठी हिताचाही ठरु शकतो. येणाऱ्या मार्च या महिन्यात दोन लाख लोकांना नोकऱ्या मिळू शकतात.

ॲपलने आणखी एक अंदाज व्यक्त केला तो म्हणजे या नोकऱ्यांमध्ये ७०टक्के महिलांचाच समावेश होणार आहे. यामुळे महिलांनी याचा पुरेपूर फायदा घ्यायला हरकत नाही. या आधी ॲपलच्या भारतात असलेल्या तीन कंत्राटी उत्पादक कंपन्यांनी ८०,८७२ नागरिकांना नोकऱ्या दिल्या. त्या कंपन्या म्हणजे फॉक्सकॉन, विस्ट्रॉन आणि पेगाट्रॉन. त्याचबरोबर भारतातल्या टाटा समुह, सालकॉम्प, मदरसन, सनवोडा,एटीएल आणि जबिल या मोठ्या कंपन्यांनी ८४,००० नोकऱ्या नागरिकांना दिल्या होत्या.या मोठ्या कंपन्यांमध्ये तुम्हाला योग्य कामाच्या पातळी नोकऱ्या मिळू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Goregaon Crime: इमारतीत शिरून मोबाईल चोरीचा प्रयत्न; ५ जणांकडून बेदम मारहाण, हाणामारीत तरुणाचा मृत्यू

Wednesday Horoscope : दिवाळी पाडव्याचा आनंद द्विगुणीत होणार; महत्वाची कामे दुपारनंतर करा, अन्यथा...

Maharashtra Live News Update: ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात परतीच्या पावसाचा धुमाकूळ

Mumbai Port Authority: सफाई कर्मचाऱ्यांच्या घरांचा प्रकल्प रखडला; ‘मुंबई पोर्ट’कडून परवानगीसाठी विनंती

Ratnagiri Tourism : प्राचीन वास्तुकला अन् रेखी‍व शिल्पे, रत्नागिरीत गेल्यावर 'ही' लेणी पाहायला नक्की जा

SCROLL FOR NEXT