नोकरीच्या शोधात असणाऱ्या महिलांसाठी आनंदाची बातमी आहे.अंगणवाडीत भरती जाहीर करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश सरकार लवकरच ६९००० पदे भरती करणार आहेत. यामध्ये अंगणवाडी सेविका पदासाठी ७९५२ जागा रिक्त आहेत तर मदतनीस पदासाठी ६१२५४ जागा रिक्त आहेत. ही भरती लवकरच होणार आहे.
उत्तर प्रदेश बाल विकास आणि पोषण संचलनायलाने यासंबंधित निर्देश जारी केले आहे. यामध्ये तुम्हाला सविस्तर माहिती अंगणवाडी पोर्टलवर दिली गेली आहे. तुम्ही upanganwadibharti.in या वेबसाइटवर जाऊन सविस्तर अधिसूचना वाचू शकतात. यामध्ये कोणत्या जिल्ह्यात किती जागा रिक्त आहेत हे तुम्हाला समजणार आहे. (Anganwadi Recruitment)
पात्रता
उत्तर प्रदेशमधील अंगणवाडीतील या भरती मोहिमेत फक्त महिला अर्ज करु शकणार आहेत. या नोकरीसाठी १२वी पास असणे गरजेचे आहे. १८ ते ३५ वयोगटोतील महिला या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. अर्ज करताना महिलांकडे रहिवासी प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.
जर महिला विवाहित असेल तर त्या सासरच्या रहिवासी प्रमाणपत्रावर आधारित अर्ज करु शकतात. या भरती मोहिमेत महिलांची निवड कोणत्याही परीक्षेशिवाय होणार आहे. इंटरमीडीएट, ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनमधील गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
अंगणवाडी सेविकांची ५० टक्के पदे ही सध्या कार्यरत असलेल्या अंगणवाडी मदतनीसांद्वारे भरली जाणार आहेत. यामध्ये ज्या जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका पदासाठी भरती केली जाणार आहे. त्या ग्रामीण क्षेत्रात महिलांना अंगणवाडी मदतनीस म्हणून वर्षे काम केलेले असावे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.