AAI Recruitment 2024 Saam Tv
naukri-job-news

AAI Recruitment: १०वी, १२ वी पास तरुणांसाठी नोकरीची संधी; एअरपोर्ट ऑथोरिटीमध्ये भरती सुरु; जाणून घ्या सविस्तर

Airport Authority Of India Recruitment: एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. एअरपोर्ट ऑथोरिटीमध्ये ज्युनिअर असिस्टंट पदासाठी भरती सुरु आहे.

Siddhi Hande

१० वी आणि १२ वी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये सध्या भरती सुरु आहे. एअरपोर्ट ऑथोरिटीमध्ये ज्युनिअर असिस्टंट (फायर सर्व्हिस) पदासाठी भरती करण्यात येणार आहे. या नोकरीबाबत अधिसूचना जाहीर केली आहे. या नोकरीसाठी भरती प्रक्रिया ३० डिसेंबरपासून सुरु होणार आहे. (Airport Authority Of india)

एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियामधील या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ जानेवारी २०२५ आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये ८९ रिक्त पदांसाठी भरती सुरु आहे. यातील ४५ जागा या सामान्य प्रवर्गासाठी आहे इतर जागा राखीव प्रवर्गासाठी आहे. ज्युनिअर असिस्टंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी १० वी पास असणे गरजेचे आहे. तसेच मॅकेनिकल/ऑटोमोबाईल आणि फायरमध्ये डिप्लोमा केलेला असावा. या नोकरीसाठी १२ वी पास उमेदवारदेखील अर्ज करु शकतात. याबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

या नोकरीसाठी १८ ते ३० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ३१००० ते ९२००० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड परिक्षेद्वारे केली जाणार आहे.

नाबार्डमध्ये भरती

सध्या नाबार्डमध्ये नोकरी करण्याचीदेखील सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. नाबार्डमध्ये सध्या स्पेशलिस्ट पदासाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ जानेवारी २०२५ आहे. या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tandoor Paneer Tikka Recipe: रेस्टॉरंटस्टाईल तंदूर पनीर टिक्का घरी कसा बनवायचा? पाहा ही सोपी रेसिपी

Hair Oil Benefits: केस धुण्यापूर्वी केसांना तेल लावण्याचे फायदे काय?

Face Care: डलनेस आणि टॅन कमी करण्यासाठी आठवड्यातून २ वेळा 'हा' घरगुती खास फेसपॅक नक्की लावा

Mantralaya Bribe Case: निधी मंजुरीसाठी ६ लाखांची लाच; मंत्रालयातल्या आणखी एका अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं

नाशिकची घटना ताजी असताना संभाजीनगरात टेम्पो विहिरीत कोसळला|VIDEO

SCROLL FOR NEXT