CRPF Job: परीक्षेशिवाय मिळेल नोकरी अन् पगार ७५ हजार; आजच करा अर्ज

Government Job : CRPF मध्ये न परीक्षा देता नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. निवड झालेल्या उमेदवारांना पगारासह सर्व शासकीय सुविधा सुद्धा मिळणार आहेत. या नोकरीसाठी अर्ज कसा करायचा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा काय हे जाणून घेऊ.
Government Job
CRPF JobGoogle
Published On

सरकरी नोकरी करण्याची शोधार्थ असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलात नोकरीची संधी चालून आलीय. यात नोकरी मिळण्यासाठी तुम्हाला कोणतीच परीक्षा द्यावी लागणार नाहीये. सीआरपीएफने या नोकरीसंदर्भात जाहिरात दिलीय. पशुवैद्यकीय पदांसाठी रिक्त जागांवर भरती केली जाणार आहे. विशेष म्हणजे अर्जदारांना ही नोकरी मिळवण्यासाठी कोणतीच परीक्षा देण्याची गरज नाहीये.

भरती केल्या जाणाऱ्या पदावर तुमची निवड झाल्यास तुम्हाला दरमहा ७५,००० रुपये पगार मिळेल. तसेच सर्व सरकारी भत्त्यांचा लाभ मिळेल. या नोकरीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा काय आहे जाणून घेणं आवश्यक आहे. उमेदवार ६ जानेवारी किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात. एनडीआरएफच्या पाचव्या आणि १० व्या बटालियनसाठी ही भरती केली जात आहे. या पदांवर नोकरी मिळवायची असेल तर अर्ज करण्यापूर्वी काही गोष्टी डोक्यात ठेवणं आवश्क आहे.

CRPF भरतीसाठी पात्रता काय?

CRPF च्या या भरतीसाठी उमेदवारांना कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुधन या विषयात पदवी प्राप्त करणं आवश्यक आहे. तसेच उमेदवारांना भारतीय पशुवैद्यकीय परिषदेकडे नोंदणी करणेदेखील बंधनकारक आहे.

वयोमर्यादा

CRPF च्या या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी कोणतीही किमान वयोमर्यादा नाहीये. मात्र कमाल वयोमर्यादा निश्चित करण्यात आली असून ती ७० वर्ष ठेवण्यात आलीय.

Government Job
Success Story: वडील रिक्षा ड्रायव्हर; आर्थिक परिस्थिती बिकट, २१ व्या वर्षी क्रॅक केली UPSC; महाराष्ट्राच्या लेकाची यशोगाथा वाचा

किती पगार मिळेल?

निवड झाल्यास उमेदवारांना दरमहा ७५,००० रुपये पगार असेल. तसेच सर्व शासकीय सुविधा व भत्त्यांचा लाभ मिळणार आहे. भविष्य निर्वाह निधी, पेन्शन, ग्रॅच्युइटी अशा सर्व सुविधाही मिळतील.

परीक्षा न देता मिळेल नोकरी?

विशेष म्हणजे उमेदवारांना या भरतीसाठी कोणतीच लेखी परीक्षा द्यावी लागणार नाहीये. अर्ज केल्यानंतर उमेदवारांना वॉक-इन मुलाखतीसाठी बोलावले जाणार आहे. मुलाखतीनंतर उमेदवारांची वैद्यकीय चाचणी होईल. मुलाखत ६ जानेवारी २०२५ रोजी पुणे आणि हैदराबाद येथे घेण्यात येईल. मुलाखतीच्या पत्त्याशी संपूर्ण माहिती तुम्ही अधिकृत वेबसाइटवर पाहू शकता.

Government Job
Government Holiday: लाडकी बहीण योजनेचा फायदा शासकीय कर्मचाऱ्यांना? भाऊबीजेला मिळणार अतिरिक्त सुट्टी

मुलाखतीसाठी पत्ता

तारीख आणि वेळ, स्थळ

पुणे

६ जानेवारी २०२५, सकाळी ९ वाजता.

कंपोझिट हॉस्पिटल, CRPF, GC कॅम्पस, तळेगाव, पुणे, महाराष्ट्र – ४१०५०७

हैदराबाद

६ जानेवारी २०२५, सकाळी ९ वाजता. कंपोझिट हॉस्पिटल, CRPF, हैदराबाद, तेलंगणा – ५०००५.

अर्ज कसा कराल?

पगार किती मिळणार ते माहिती झालं. मुलाखत कधी आणि कुठे असेल तेही माहिती झालं. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या पदासाठी अर्ज कसा करावा लागेल. हे जाणून घेणंही आवश्यक आहे. तर वॉक-इन-मुलाखतीसाठी उपस्थित इच्छुक उमेदवारांना त्यांच्या सर्व आवश्यक कागदपत्रांच्या मूळ आणि झेरॉक्स कॉपी घेऊन यावे लागले.

यात शैक्षणिक प्रमाणपत्र, वयाचा पुरावा, अनुभव प्रमाणपत्र सोबत ठेवावे लागतील. तसेच अर्जाचा फॉर्म, तीन पासपोर्ट साईज फोटोबरोबर ठेवावा लागेल. वैद्यकीय चाचणीनंतर उमेदवारांना मुलाखतीला उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com