AIIMS Recruitment Saam Tv
naukri-job-news

AIIMS Recruitment: परीक्षा नाही थेट नोकरी, पगार महिना ६७७०० रुपये, AIIMS मध्ये नोकरीची मोठी संधी; कसा कराल अर्ज?

AIIMS Recruitment 2024: एम्समध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. एम्समध्ये ५२ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ ऑक्टोबर २०२४ आहे.

Siddhi Hande

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था म्हणजेच AIIMS मध्ये नोकरी करण्याची चांगली संधी आहे. एम्समध्ये सिनियर रेजिडेंट पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. एम्स पटनासाठी ही भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या aiimspatna.edu.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे.

एम्स पटनामध्ये नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ ऑक्टोबर २०२४ आहे. ५२ पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.एम्स पटनामध्ये विविध विभागांमध्ये सिनियर रेजिडेंट पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. अॅनाटॉमि, बायोकेमिस्ट्री, कार्डिओलॉजिस्ट, न्युरोलॉजी, पॅथालॉजी, हॉस्पिटल अॅडमिनिस्ट्रेशन अशा विविध विभागांमध्ये ही भरती केली जाणार आहे.

या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना १५०० रुपये शुल्क भरायचे आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना १२०० रुपये शुल्क भरायचे आहेत. तर माजी सैनिक, महिला, पीडब्ल्यूबीडी उमेदवारांना कोणतेही शुल्क द्यायचे नाही. (Aiims Patna Job)

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ४५ वर्ष असावी.या नोकरीसाठी पदानुसार उमेदवारांचे वेतन ठरवण्यात येणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांना ६७७०० रुपये मासिक वेतन मिळणार आहे. या नोकरीसाठी मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. (Aiims Job)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या विठाबाई नारायणगावकर तमाशा मंडळातील कलाकरांना मारहाण

Farmer Loan waiver : महाराष्ट्रातील ७० हजार शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, ५०० कोटी रुपये मिळणार

एकनाथ शिंदे यांची ताकद आणखी वाढणार; २ पॉवरफुल नेत्यांची शिवसेनेत एन्ट्री होणार, राजकीय समीकरण बदलणार

Kundali Matching Tips For Marriage: लग्नासाठी मुला- मुलीचे किती गुण जुळले पाहिजेत?

Ashok Kharat Case: नगरसेवक होऊ शकत नाही, बुवाबाजी करून आमदार, मंत्री व्हायचंय; भाजपच्या महिला नेत्याचा रोख कुणाकडे?

SCROLL FOR NEXT