Police Department Job: पुणे पोलीस दलात नोकरीची संधी; परीक्षेशिवाय मिळणार नोकरी, कोणत्या जागी निघाली भरती? जाणून घ्या सविस्तर

Police Department Bharti: पुणे पोलिस विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. पुणे पोलिस विभागात १५२ पदांसाठी भरती सुर आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत.
Police Department Job
Police Department JobSaam Tv
Published On

पोलीस विभागात नोकरी करण्याची उत्तम संधी आहे. पोलीस आयुक्त कार्यालय, पुणे येथे विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात १५२ पदांसाठी रिक्त जागा आहेत. या नोकरीसाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

पोलीस विभागातर्फे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ ऑक्टोबर २०२४ आहे. (Pune Police Department Recruitment)

Police Department Job
ESIC Jobs : रेझ्युम आताच तयार करा, परीक्षाशिवाय सरकारी नोकरी, महिना ६७००० रुपये पगार; जाणून घ्या सविस्तर

पोलीस विभागात सफाई कामगार पदासाठी १०२ जागा रिक्त आहे. कार्यालयीन शिपाई पदासाठी ३३ जागा रिक्त आहे. आचारी पदासाठी १ जागा तर सहाय्यक आचारी पदासाठी ७ जागा रिक्त आहेत. भोजन सेवक पदासाठी ९ जागा रिक्त आहेत.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून किंवा विद्यापीठातून १०वी, १२वी पास किंवा पदवीधर असणे गरजेचे आहे.या नोकरीसाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. पोलीस आयुक्त, कार्यालय पुणे शहर, ०२, साधू वासवानी रोड, कॅम्प पुणे-४११००१ येथे अर्ज पाठवायचा आहे.

ही नोकरी पुणे पोलीस विभागात निघाली आहे. या नोकरीसाठी तुम्ही punepolice.gov.in या वेबसाइटवर जाऊन माहिती वाचू शकतात.

Police Department Job
Bharat Petroleum Job: 'बीपीसीएल'मध्ये नोकर भरती; इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांना मोठी संधी, पात्रता काय? पगार किती? जाणून घ्या

हिंदुस्तान एयरोनॉटिक्समध्ये भरती

सध्या हिंदुस्तान एयरोनॉटिक्समध्येही भरती सुरु आहे. ऑपरेटर पदासाठी ही भरती केली जाणार आहे.या नोकरीसाठी ५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करु शकतात. याबाबत हिंदुस्तान एअरोनॉटिक्समध्ये अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी २२००० ते २३००० रुपये वेतन मिळणार आहे.

Police Department Job
DRDO Job: परीक्षा नाही, थेट सरकारी नोकरी; डीआरडीओ निघाली भरती, पगार किती? पात्रता काय? जाणून घ्या सविस्तर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com