Health Department Job Saam Tv
naukri-job-news

Aarogya Vibhag Bharti: आरोग्य विभागात नोकरीची संधी; या पदांसाठी भरती सुरु, अर्ज कसा करावा?

Aarogya Vibhag Bharti 2025: आरोग्य विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. ठाणे महानगरपालिकेअंतर्गत ही भरती केली जाणार आहे.

Siddhi Hande

आरोग्य विभागात नोकरी करायची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखाली मेट्रोपालिटन सहेलन्स यूनिटअंतर्गत उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागातील या नोकरीसाठी अर्ज मागवण्यात आले आहे. या भरतीची जाहिरात सार्वजनिक विभागाद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.

या पदांसाठी भरती

सार्वजनिक आरोग्य विभागात विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. वरिष्ठ सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, सहाय्यक सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, अन्न सुरक्षा तज्ञ, प्रशासन अधिकारी, तांत्रिक अधिकारी, प्रशिक्षण व्यवस्थापक , डेटा विश्लेषक या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही पदे कंत्राटी पद्धतीने भरती केली जाणार येणार आहे. या नोकरीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत

सार्वजनिक आरोग्य विभागात २३ पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. या नोकरीबाबत सविस्तर माहिती https://www.tmc.gov.in/ या वेबसाइटवर देण्यात आली आहे.या वेबसाइटवरुन अर्ज डाउनलोड करावा. यानंतर अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने पाठवायचा आहे.

अर्ज कुठे पाठवायचा?

नोकरीसाठी अर्ज पाठवताना पासपोर्ट साइज फोटो, वयाचा दाखला, शैक्षणिक प्रमाणपत्र, अनुभवाचे प्रमाणपत्र या गोष्टी आवश्यक आहे. या नोकरीसाठी तुम्हाला अर्ज ठाणे महानगरपालिका, मुख्यालय, चौथा मजला, आरोग्य विभाग ठाणे येथे पाठवायची आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची मुलाखत ११,१२ सप्टेंबर रोजी होणार आहे.

ठाणे महनगरपालिकेअंतर्गत ही भरती केली जाणार आहे. ठाणे महानगरपालिकेअंतर्गत येणाऱ्या सार्वजनिक आरोग्य विभागात ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर तुम्हाला २५,००० ते ५०,००० रुपये पगार मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha vs OBC Row : 'अजित पवारांनी साप पोसलेत' भुजबळांनंतर जरांगेंचा अजित पवारांवर हल्लाबोल

KDMC : कल्याणमधील कचरा संकलनाचा ठेका किती कोटींचा? अधिकाऱ्यांनाच ठाऊक नाही, पालिकेत नेमकं काय घडतंय?

Rohit Sharma : रोहित शर्माचं वाढलेलं पोट सपाट, 'हिटमॅन' झाला फीटमॅन

Yogesh Kadam on Ghaywal Gang : गुंड घायवळच्या भावाला शस्त्र परवाना कुणी दिला? मंत्री योगेश कदम यांनी केला खुलासा

Jalgaon : चोरट्यांची स्मशानाभूमीवर नजर, सोन्याच्या लालसेनं स्मशानभूमीत चोरी

SCROLL FOR NEXT