AAI Recruitment saam tv
naukri-job-news

AAI Recruitment: एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी; मिळणार भरघोस पगार; आजच करा अर्ज

AAI Recruitment 2025: एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.

Siddhi Hande

एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी

ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह पदांसाठी भरती

२७ सप्टेंबरपर्यंत करु शकता अर्ज

एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया कालपासून सुरु झाली आहे. २८ ऑगस्टपासून ही अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी www.aai.aero या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. यासाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.

अधिसूचनेनुसार, एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह पदासाठी ९७६ जागा रिक्त आहेत. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी १ महिन्याची मुदत देण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ सप्टेंबर २०२५ आहे.

पात्रता (Eligibility)

ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आर्किटेक्चर/इंजिनियरिंग / टेक्नोलॉजी / कॉम्प्युटर सायन्स/ कॉम्प्युटर इंजिनियरिंग किंवा आयटी विषयात पदवी प्राप्त केलेली असावी. याचसोबत उमेदवारांची कमाल वयोमर्यादा २७ वर्षे असावी. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांनी ४०,००० ते १,४०,००० रुपये पगार मिळणार आहे.

अर्ज कसा करावा? (Application Process)

एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियामधील नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

सर्वात आधी तुम्हाला www.aai.aero वेबसाइटवर जा.

या वेबसाइटवर RECRUITMENT OF JUNIOR EXECUTIVES यावर क्लिक करा.

यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन लिंकवर क्लिक करायचे आहे.

यानंतर यूजर आयडी आणि पासवर्ड टाकायचा आहे.

यानंतर तुम्हाला तुमची माहिती भरायची आहे. यानंतर कागदपत्रांची कॉपी टाकायची आहे.

यानंतर फॉर्म सबमिट करायचा आहे. याची प्रिंट आउट काढून ठेवावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Ornaments: कोणत्या लोकांनी सोनं घालू नये? कारण एकदा वाचाच

Manoj Jarange Patil Protest Live Updates : आझाद मैदानात एका तरुणाचा फाशी घेण्याचा प्रयत्न

Manoj Jarange: मनोज जरांगेंना ओबीसीमधूनच आरक्षण का हवय?

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजने’वरून जरांगे पाटलांचा फडणवीसांवर हल्लाबोल; नेमकं काय म्हणाले? VIDEO

Maharashtra Live News Update: मराठा आरक्षण मिळवण्यासाठी पूर्ण पाठिंबा - छत्रपती संभाजीराजे

SCROLL FOR NEXT