Chandrayaan 3 Live Updates: अवघ्या जगाचं लक्ष लागलेलं चांद्रयान ३ आज झेपावणार आहे. चंद्रयानाचं यशस्वी प्रक्षेपण होऊन मोहीमही फत्ते व्हावी यासाठी सर्वचजण प्रार्थना करत आहे. फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोने देखील इस्रोच्या अधिकाऱ्यांसाठी खास डिश पाठवली आहे. कंपनीने ट्वीट करत याबाबत माहिती दिली. हे ट्वीट आता व्हायरल होत आहे.
झोमॅटोने कुटुंबातील सदस्याप्रमाणे मिशनच्या यशासाठी खास पाऊल उचललं आहे. ज्याप्रमाणे प्रत्येक आई आपल्या मुलाला परीक्षेसाठी किंवा कोणत्याही चांगल्या कामासाठी जाण्यापूर्वी दही आणि साखर खाऊ घालते, त्याचप्रमाणे Zomato ने ISRO अधिकाऱ्यांना त्यांच्या मेहनतीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
झोमॅटोने ट्वीट करत म्हटलं की, इस्रोसाठी दही-साखर पाठवत आहे. सध्या हे टीविट सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
चंद्रावर जात असलेले ISRO चे चांद्रयान -३ हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. आतापर्यंत या ठिकाणी कुठलेही यान पोहोचलेले नाही. त्यामुळे संपूर्ण जगभरातील शास्त्रज्ञ भारताच्या चांद्रयान- 3 मोहीमेवर लक्ष ठेवून आहेत. चांद्रयान २ च्या अपयशानंतर भारताचा हा दुसरा प्रयत्न आहे. (Latest News Update)
चांद्रयान-2 मोहिमेसाठी 960 कोटी रुपये खर्च आला होता. तर चांद्रयान-3 मोहिमेसाठी 615 कोटी रुपये खर्च आला आहे. त्यामुळे चंद्रायान -3 मोहिमेचा खर्च मागच्या मोहिमेपेक्षा कमी असल्याचे दिसून येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.