zoho mail founder sridhar vembu x
देश विदेश

WhatsApp चा पर्याय बनवणाऱ्या Zoho Mail चे संस्थापक आहेत 'भारतीय', संपत्तीचा आकडा वाचून धक्का बसेल

Zoho Mail : झोहो मेल ही सॉफ्टवेअर कंपनी सध्या चर्चेत आहे. या कंपनीने व्हॉट्सअ‍ॅपला पर्यायी असा अरत्ताई मेसेजिंग अ‍ॅप बनवला आहे. या कंपनीच्या संस्थापकाची संपत्ती ५०,००० कोटी रुपये इतकी आहे.

Yash Shirke

  • झोहो मेलचे संस्थापक श्रीधर वेम्बू भारतीय आहेत.

  • त्यांची संपत्ती सुमारे ५०,००० कोटी रुपये आहे.

  • झोहोने अरत्ताई हा मेसेजिंग अ‍ॅप बनवला आहे.

Zoho : आंतरराष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपनी झोहो मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. झोहो कंपनीचा अरत्ताई (Arattai) हा मेसेजिंग अ‍ॅप हा व्हॉट्सअ‍ॅपसाठी मजबूत पर्याय बनला आहे. बरेचसे यूजर्स हे गोपनीयता, मोफत सेवा आणि अन्य फायद्यांमुळे जीमेलवरुन झोहो मेलवर स्विच करत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी झोहो मेलवर स्विच केल्याचे एक्स या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केले होते. यानंतर लोकांमध्ये झोहोबाबत उत्सुकता निर्माण झाली.

झोहो कॉर्पोरेशनच्या संस्थापकांचे नाव श्रीधर वेम्बू असे आहे. १९६८ मध्ये जन्मलेले वेम्बू हे प्रसिद्ध भारतीय उद्योगपती आहेत. फोर्ब्स २०२४ च्या यादीनुसार, ते भारतातील श्रीमंतांच्या यादीत ते ३९ व्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती अंदाजे ५.८५ अब्ज डॉलर्स (अंदाजे ५०,००० कोटी रुपये) इतकी आहे. २०२१ मध्ये त्यांना पद्मश्री देऊन सन्मानित करण्यात आले.

श्रीधर वेम्बू यांचा जन्म तामिळनाडूच्या तंजावर जिल्ह्यातील एका ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांनी आयआयटी मद्रासमधून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले. त्यानंतर ते अमेरिकेतील प्रिन्सटन विद्यापीठातून पदव्युत्तर झाले. त्यांनी पीएचडीची पदवी देखील मिळवली. क्वालकॉममध्ये वायरलेस इंजिनीअर म्हणून कारकीर्दीची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी सॅन फ्रान्सिस्को बे एरियामध्ये काम केले. १९९६ मध्ये श्रीधर वेम्बू यांनी त्यांच्या भावांसोबत अ‍ॅडव्हेंटनेटची स्थापना केली, याचे रुपांतर पुढे झोहो कॉर्पोरेशनमध्ये झाले. ही कंपनी क्लाउड सॉफ्टवेअर आणि सीआरएम सोल्यूशन्ससाठी जगभरात ओळखली जाते.

२०१९ मध्ये श्रीधर वेम्बू यांनी अमेरिकेतून तामिळनाडू येथील तेनकासी गावात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. या गावातूनच ते सर्व काम पाहतात. तंत्रज्ञान आणि गावाचा विकास एकसाथ व्हायला हवा असे त्यांचे मत आहे. झोहो कॉर्पोरेशनचे ८८ टक्के त्यांच्या मालकीचे आहेत. कंपनीची प्रगती पाहता काही वर्षांत त्यांची संपत्ती दुप्पट होईल असे म्हटले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Housing Society Elections : गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणूका ऑनलाइन होणार; सरकारनं नेमका काय निर्णय घेतलाय? VIDEO

Maratha vs OBC Row : 'अजित पवारांनी साप पोसलेत' भुजबळांनंतर जरांगेंचा अजित पवारांवर हल्लाबोल

KDMC : कल्याणमधील कचरा संकलनाचा ठेका किती कोटींचा? अधिकाऱ्यांनाच ठाऊक नाही, पालिकेत नेमकं काय घडतंय?

Rohit Sharma : रोहित शर्माचं वाढलेलं पोट सपाट, 'हिटमॅन' झाला फीटमॅन

Yogesh Kadam on Ghaywal Gang : गुंड घायवळच्या भावाला शस्त्र परवाना कुणी दिला? मंत्री योगेश कदम यांनी केला खुलासा

SCROLL FOR NEXT