Zakir Hussain Passes Away Google
देश विदेश

Zakir Hussain: ११ व्या वर्षी कार्यक्रम करणाऱ्या झाकीर हुसेन यांनी कुठून शिकली तबला वादनाची कला? वाचा न ऐकलेला किस्सा

Zakir Hussain Passes Away : सुप्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसेन यांनी जगाचा निरोप घेतलाय. आपल्या तबला वादनाच्या जादूने कोणालाही भुरळ घालत. उस्ताद झाकीर हुसेन यांच्या आयुष्यातील काही किस्से आपण आज जाणून घेणार आहोत.

Bharat Jadhav

तबला वादनाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे झाकीर हुसेन हे याचे निधन झाले आहे. त्यांनी अखेरचा श्वास अमेरिकेतील फ्रॉन्सिस्कोमध्ये घेतला. झाकीर हुसेन यांच्या जीवनातील काही न ऐकलेले किस्से आपण जाणून घेणार आहोत. झाकीर हुसेन यांचा जन्म ९ मार्च १९५१ मध्ये झाला होता. तबला वादनाची कला त्यांना वडिलोपार्जित मिळाली होती. झाकीर हुसेन यांच्या वडिलांचेही संगीत विश्वात मोठे नाव होते. ते तबलावादकही होते.

वडिलांना पाहून उस्ताद झाकीर हुसेन यांना तबल्यावर जुगलबंदी करण्याची आवड निर्माण झाली. वडिलांनीही त्यांना तबला वादनातील बारकावे आवडीने शिकवले. झाकीर हुसेन यांनी तबला वादनातील सर्व बारकावे शिकून घेत ती कला पूर्णपणे आत्मसात केली. मुंबईत जन्मलेल्या झाकीर हुसेन यांनी सेंट झेवियर्स कॉलेजमधून शिक्षण घेतले. वयाच्या 11 व्या वर्षी त्यांनी अमेरिकेत त्यांच्या आयुष्यातील पहिला कार्यक्रम केला.

त्यानंतर हुसेन यांची संगीत जगतात ओळख होऊ लागली. त्यांचा पहिला अल्बम 1973 साली आला होता. त्याचे लोकांनी भरभरून कौतुक केलं. 'लिव्हिंग इन द मटेरियल वर्ल्ड' या अल्बमने त्यावेळी खळबळ उडवून दिली होती. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी ऑल-स्टार ग्लोबल कॉन्सर्टमध्ये सहभागी होण्यासाठी व्हाईट हाऊसमध्ये आमंत्रित केलेले उस्ताद हे पहिले भारतीय कलाकार होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हेलिकॉप्टर बैज्या आणि ब्रेकफेल बैलजोडी ठरली फार्च्युनरची मानकरी; पुढच्या शर्यतीसाठी महागड्या कारची घोषणा

Politics : राष्ट्रवादी काँग्रेसला होम ग्राऊंडवर मोठा धक्का; कट्टर तटकरे समर्थकांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

महायुतीत मिठाचा खडा? तानाजी सावंतांची राष्ट्रवादीवर जहरी टीका, अजित पवारांच्या नेत्याकडूनही जोरदार पलटवार

Monday Horoscope : मानसिक ताण अन् विनाकारण खर्च होणार; ५ राशींच्या लोकांवर नवं संकट

Maharashtra Live News Update : अपघातग्रस्त विद्यार्थ्यांची विचारपूस करण्यासाठी आमदार आमश्या पाडवी जिल्हा रुग्णालयात

SCROLL FOR NEXT