Dhruv Rathee Biography Saam Tv
देश विदेश

Youtuber Dhruv Rathee: ध्रुव राठी कोण आणि त्याची महिन्याची कमाई किती? जाणून घ्या सविस्तर

Youtuber Dhruv Rathee Biography: युट्यूबर ध्रुव राठीला संपूर्ण देशभरात ओळखले जाते.ध्रुव राठी हा एक युट्यूबर असून तो राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक विषयांवर व्हिडिओ बनवत असतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Youtuber Dhruv Rathee Career And Net Worth:

सध्या सोशल मीडियाचा वापर करुन अनेक लोक लाखो रुपये कमावतात. अनेक लोक इन्स्टाग्रामवर रिल्स बनवून किंवा युट्यूबवर व्हिडिओ बनवून प्रसिद्ध झाले आहेत. असाच एक प्रसिद्ध युट्यूबर म्हणजे ध्रुव राठी. ध्रुव हा युट्यूबर वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओ बनवतो.

युट्यूबर ध्रुव राठीला संपूर्ण देशभरात ओळखले जाते. तो जगभरातील तसेच देशातील अनेक विषयांवर व्हिडिओ बनवत असतो. तो नेहमीच शिक्षणाबद्दल जनजागृती करत असतो. ध्रुव राठीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यातूनच ध्रुव राठी लाखो रुपये कमावतो. (Latest News)

कोण आहे ध्रुव राठी?

ध्रुव राठी हा २९ वर्षांचा भारतीय युट्यूबर, व्लॉगर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएनसर आहे. तो सामाजिक, राजकीय, शैक्षणिक विषयांवर व्हिडिओ बनवत असतो. सोशल मीडियावर त्याचे १७ दक्षलाखहून अधिक फॉलोवर्स आहेत.

ध्रुव राठीचा जन्म हरियाणाच्या रोहतकमध्ये झाला आहे. त्याने शालेय शिक्षण दिल्ली पब्लिक स्कूल, आरके पुरममध्ये झाले आहे. त्याने जर्मनीतील कार्लस्रुहे इन्स्टिट्यूटमधून इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून ( mechanical engineering from Karlsruhe Institute of Technology in Germany)अंभियांत्रिकी पदवीचे शिक्षण घेतले आहे. त्याने उच्च शिक्षण देखील घेतले.

ध्रुव राठीने २०१३ मध्ये युट्यूब करिअरला सुरुवात केली. त्याने सुरुवातीला ट्रॅव्हल व्हिडिओ बनवले. त्यानंतर त्याने राजकीय आणि सामाजिक समस्यांवर व्हिडिओ तयार केले आहे. त्याचे सोशल मीडियावर १७.१ मिलियन फॉलोवर्स आहेत. २०२३ मध्ये ध्रुव राठीला युट्यूबचे डायमंड प्ले बटण मिळाले.

ध्रुव राठी हा युट्यूबच्या माध्यमातून लाखो रुपये कमावतो. एका रिपोर्टनुसार, ध्रुव राठीची संपत्ती २७ कोटी रुपये आहे. तसेच महिन्याचे उत्पन्न ४८ लाख रुपये आहे. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cyber Crime : चांगला नफा मिळविण्यासाठी गुंतवणूक करणे पडले महागात; कोट्यवधी रुपयांचा गंडा

Sonam Kapoor: अभिनेत्री सोनम कपूर ४०व्या वर्षी पुन्हा होणार आई; लवकरच देणार चाहत्यांना खूशखबर...!

Post Office Scheme: फक्त व्याजावर 12 लाख कमाई! पोस्ट ऑफिसची ही जबरदस्त योजना तुम्ही पाहिली का?

Maharashtra Crop Inspection : शेतकऱ्यासाठी महत्त्वाचा निर्णय, प्रत्येक गावात होणार पीक पाहणी, चंद्रशेखर बावनकुळेंचा आदेश

Beed : जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यासाठी नारायण गडावर जय्यत तयारी | VIDEO

SCROLL FOR NEXT