youtuber agastya chauhan death Saam Tv
देश विदेश

Youtuber Agastya Chauhan Death: व्हिडिओने केला घात! 300 किमीच्या वेगाने बाइक चालवणाऱ्या युट्यूबर अगस्त्य चौहानचा दुर्दैवी मृत्यू

Indian Youtuber Passed Away: 3 मे रोजी सकाळी यमुना एक्स्प्रेस हायवेवर अगस्त्य चौहानचा मृत्यू झाला.

Priya More

Delhi News: प्रसिद्ध बाइक रायडर आणि युट्युबर अगस्त्य चौहान (Youtuber Agastya Chauhan) याचा रस्ते अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 3 मे रोजी सकाळी यमुना एक्स्प्रेस हायवेवर अगस्त्यचा मृत्यू झाला. अपघातावेळी युट्युबर अगस्त्य ताशी 300 किलोमीटर प्रति तास वेगाने रेसिंग बाइक चालवत होता. याचवेळी त्याची बाइक डिव्हायडरवर धडकून अपघात झाला. अपघातावेळी अगस्त्य युट्युब व्हिडिओ शूट करत होता.

उत्तराखंडमधील प्रसिद्ध युट्युबर अगस्त्य चौहान ( 25 वर्षे) डेहराडूनच्या चक्रता रोडवरील कपरी ट्रेड सेंटरमध्ये आपल्या कुटुंबासोबत राहत होता. बुधवारी सकाळी तो डेहराडूनवरुन दिल्लीकडे निघाला होता. दिल्लीमध्ये युट्युबर्सची बैठक होणार होती. त्यामध्ये सहभागी होण्यासाठी तो दिल्लीला निघाला होता. अगस्तसोबत त्याचे 4 युट्युबर मित्र देखील होते. अगस्त्य यावेळी त्याची आवडती निन्जा ZX10R सुपरबाइकवरून प्रवास करत होता. या प्रवासादरम्यान त्याचा अपघात झाला आणि दुर्दैवी मृत्यू झाला.

अगस्त्य यमुना एक्स्प्रेसवेच्या माईलस्टोन क्रमांक-47 वर पोहोचताच त्याचा बाइकवरील ताबा सुटला आणि ती डिव्हायडरवर जोरात धडकली. अपघातादरम्यान अगस्त्यचे डोके रस्त्यावर आदळले गेले आणि तो गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्यावरील हेल्मेटचा चुराडा झाला होता. अपघातामध्ये जखमी झालेल्या अगस्त्यचा जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे जागीच मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. अपघातानंतर अलीगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अगस्त्यच्या गाडीच्या क्रमांकावरुन पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला.

अगस्त्यच्या मृत्यूची बातमी कळताच त्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. ऐवढंच नाही तर तो राहत असलेल्या उत्तराखंडमध्ये शोकळला पसरली आहे. अगस्त्यचा अपघात झाला त्यावेळी तो ताशी 300 किलोमीटर वेगाने बाइक चालवत होता. ऐवढंच नाही तर तो वेगाने बाइक चालवताना व्हिडिओ देखील रेकॉर्ड करत होता. या अपघातानंतर अलीगड पोलिसांनी वाहन चालवताना नेहमी वेग नियंत्रणात ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसंच अतिवेग हे रस्ते अपघाताचे प्रमुख कारण असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, अगस्त्य चौहान हा खूप प्रसिद्ध युट्युबर होता. अगदी लहान वयात अगस्त्य चौहानने यूट्यूबच्या माध्यमातून खूप प्रसिद्धी मिळवली होती. त्याचे प्रो रायडर 1000 नावाचे युट्युब चॅनेल होते. यूट्यूबवर त्यांचे 12 लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत. तो युट्युबवर बाइक रायडिंग करतानाचे अनेक व्हिडिओ शेअर करायचा. अगस्त्य चौहानकडे अनेक रेसिंग बाइक होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

SCROLL FOR NEXT