देश विदेश

YouTube Ban: 'या' देशात १६ वर्षांखालील मुलांवर यूट्यूब बंदी, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

Australia Kids Safety: ऑस्ट्रेलियात १६ वर्षांखालील मुलांसाठी यूट्यूब अकाउंट बंदी लागू करण्यात आली आहे. ई-सेफ्टी कमिशनरच्या शिफारशीनंतर हा निर्णय घेतला असून मुलांच्या सुरक्षेसाठी तो आवश्यक मानला जातो.

Dhanshri Shintre

  • डिसेंबर २०२५ पासून १६ वर्षांखालील मुलांना युट्यूब अकाउंट तयार करता येणार नाही

  • ई-सेफ्टी कमिशनरच्या शिफारशीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे

  • युट्यूबसह टिकटॉक, इन्स्टाग्राम, फेसबुक यांसारखे प्लॅटफॉर्म आधीच बंदीच्या यादीत आहेत

  • युट्यूबवर हानिकारक सामग्रीचा अनुभव ३७% मुलांनी घेतल्याचे अहवालात नमूद झाले आहे

ऑस्ट्रेलियाने सोशल मीडियाच्या वापराबाबत मोठा निर्णय घेतला असून डिसेंबर २०२५ पासून १६ वर्षांखालील मुलांना यूट्यूब अकाउंट तयार करण्यावर बंदी घालण्याची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियात टिकटॉक, स्नॅपचॅट, इन्स्टाग्राम, फेसबुक आणि ट्विटरवर आधीच बंदी आहे. आता याच यादीत यूट्यूबचाही समावेश करण्यात आला असून १६ वर्षांखालील मुलांसाठी यूट्यूब अकाउंट तयार करण्यावरही सरकारने निर्बंध लावले आहेत.

ई-सेफ्टी कमिशनरच्या सांगण्यावरुन सरकारने हा निर्णय घेतला असून, त्यांच्या म्हणण्यानुसार यूट्यूब हे फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी वापरले जाणारे माध्यम नसून ते सोशल मीडियासारखेच प्रभाव टाकते. त्यामुळे ते अल्पवयीन मुलांसाठी हानिकारक ठरू शकते. युरोन्यूजच्या अहवालानुसार, ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी स्पष्टपणे सांगितले की, सरकार डिजिटल युगात मुलांचे मानसिक आरोग्य आणि सुरक्षितता यांना सर्वोच्च प्राधान्य देत आहे.

आकडेवारीनुसार, १० ते १५ वयोगटातील चारपैकी तीन ऑस्ट्रेलियन मुले नियमित यूट्यूबचा वापर करतात, त्यामुळे तो टिकटॉक आणि इन्स्टाग्रामपेक्षा अधिक लोकप्रिय ठरतो. पण याचबरोबर, ३७ टक्के मुलांनी यूट्यूबवर हानिकारक किंवा त्रासदायक सामग्रीचा अनुभव घेतल्याचे नोंदवले गेले आहे.

अशा स्थितीत, यूट्यूबला इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सपासून वेगळे ठेवणे योग्य ठरणार नाही, असा निष्कर्ष आयुक्तांनी काढला. बंदी लागू झाल्यानंतर १६ वर्षांखालील मुले यूट्यूबवरील व्हिडिओ पाहू शकतील, मात्र त्यांना कॉमेंट, कंटेंट क्रिएशन आणि वैयक्तिक शिफारशी यासारख्या सुविधा वापरता येणार नाहीत. सरकारचा उद्देश स्पष्ट आहे. डिजिटल जगतात मुलांचे संरक्षण हेच सर्वोच्च धोरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भाजपच्या आमदाराने शिवसेना आमदाराच्या घरी 100 पोलीस मध्यरात्री घरात पाठवले पहा

अयोध्येतील राममंदिरावर भगवा ध्वज, काय आहे वैशिष्ट्यं ?

Local Body Election : महाराष्ट्रात घराणेशाहीचा सिक्सर,शिंदेसेनेत एकाच घरात 6 उमेदवार

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

Shocking: लग्नाला ३ वर्षे झाली, तरीही मुल होत नाही; टेन्शनमध्ये शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या, तरुणासोबत भयंकर घडलं

SCROLL FOR NEXT