Youth Congress workers raise slogans during a protest at the AI Impact Summit venue in New Delhi Saam Tv
देश विदेश

AI इम्पॅक्ट समिटमध्ये PM मोदींविरोधात घोषणा, युवा काँग्रेसच्या आंदोलनामागचं कारण काय?

Security Breach At Bharat Mandapam During AI Event: दिल्लीतील एआय इम्पॅक्ट समिटदरम्यान युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले.

Omkar Sonawane

देशाची राजधानी दिल्ली येथे सुरू असलेल्या एआय समिटमध्ये आज युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घुसून जोरदार आंदोलन केले. यामुळे उपस्थितांमध्ये एकच खळबळ उडाली. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सुरक्षा व्यवस्था तोडून प्रगती मैदानावरील भारत मंडपमम येथे सुरू असलेल्या या एआय समिटमध्ये घुसून मोठा गोंधळ घातला. तसेच देशविदेशातील पाहुण्यांसामोर शर्ट काढत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी 'पीएम इज कॉम्प्रमाईज्ड अशा घोषाण युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिल्या.

एआय समिटमध्ये आज होणाऱ्या कार्यक्रमांसाठी देश विदेशातून आलेले अनेक दिग्गज आणि इतर कंपन्यांचे प्रतिनिधि भारत मंडपमध्ये उपस्थित होते. त्यावेळी ही सर्व कार्यकर्ते फलक घेऊन कार्यक्रमाच्या मुख्य ठिकाणी जाऊन जोरदार गदारोळ घालण्यास सुरुवात केली. सुरक्षा रक्षकांनी त्यांना अडवण्याचा ही प्रयत्न केला. यावेळी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शर्ट काढत घोषणाबाजी सुरू केली. पीएम इज कॉम्प्रमाईज्ड अशा घोषणा युवक काँग्रेसचे कार्यकर्ते देत होते. सुरक्षारक्षकांनी या कार्यकर्त्यांना पकडून ताब्यात घेतले आणि लगेच कार्यक्रम परिसरातून बाहेर काढले.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एआय समिटमध्ये आंदोलन केल्या प्रकरणी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यात घेऊन गेले आहे. या आरोपींविरोधात कडक कारवाई करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले. तसेच इतका मोठा बंदोबस्त असूनही हे आंदोलक कार्यक्रमस्थळी कसे काय आले असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : कांद्याने बळीराजाला रडवलं! प्रति किलो विकला फक्त १ रुपयात, चहा-पाण्यालाही पैसे उरले नाहीत

Maharashtra News Live Update: निकाला आधीच विजयाचा जल्लोष! पुणे मार्केट यार्डात सुनेत्रवाहिनींचे बॅनर झळकले

MI vs CSK: दुखापत सँटनरच्या खांद्याला, तरीही शार्दुल कसा खेळला? मुंबई इंडियन्सने दिलं उत्तर

Weight Loss Recipe : डाएटला करा टाटा, बाय बाय; चटपटीत चाट खाऊन वजन होईल कमी, वाचा रेसिपी

Good News : मुंबई-पुण्यातून धावणार २४८ विशेष उन्हाळी ट्रेन, सर्व यादी एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT