UP youth death Saam Tv News
देश विदेश

Uttar Pradesh News: गर्लफ्रेंडला हॉटेलला बोलवलं, दारूसोबत खाल्ल्या शक्तीवर्धक गोळ्या; तासाभरातच मृत्यू, नेमकं काय घडलं?

Tragic hotel death: उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एका तरूणाची अचानक प्रकृती बिघडल्याने मृत्यू झाला आहे. आधी हॉटेलला बोलावून घेतलं, नंतर शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या. तासाभरात दुर्देवी मृत्यू. नेमकं काय घडलं?

Bhagyashree Kamble

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एका तरूणाची अचानक प्रकृती बिघडल्याने मृत्यू झाला आहे. हा तरूण कामानिमित्त ग्वाल्हेरला गेला होता. हॉटेलमध्ये त्याने गर्लफ्रेंडला बोलावून घेतलं. नंतर दारूसोबत त्याने शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या. मात्र, तासाभरात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीस चौकशी करीत असून, तरूणाचा नेमका मृत्यू कशामुळे झाला? याचा तपास सुरू आहे.

ग्वाल्हेर शहरातील थाटीपूर येथील मॅक्सन हॉटेलमध्ये एका तरूणाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या हॉटेलमध्ये विनीत कुमार यांनी दिव्यांशुसाठी रूम बुक केली होती. विनीत कुमार हा दिव्यांशुचा मित्र आहे. दिव्यांशु एका खाजगी कंपनीत चांगल्या पदावर कार्यरत होता. तो फक्त बिझनेस टुरसाठी ग्वाल्हेरला आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री दिव्यांशुने त्याच्या गर्लफ्रेंडला फोन केला. त्याने फोन करून गर्लफ्रेंडला हॉटेलमध्ये बोलावून घेतले.

रूममध्ये गर्लफ्रेंडला बोलावून घेतल्यानंतर त्याने खोलीत दारूचे सेवन केले. नंतर शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या. प्रेयसीसोबत त्यानं खोलीत तासभर घालवला. तासाभरानंतर त्याचा घाम निघू लागला. त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्याची प्रेयसी घाबरली. प्रेयसीच्या सांगण्यावरून हॉटेलच्या कर्मचार्‍याने पोलिसांना माहिती देऊन बोलावून घेतले. नंतर जवळच्या रूग्णालयात तरूणाला नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

या धक्कादायक प्रकरणानंतर पोलिसांनी त्याच्या कुटुंबियांनी माहिती दिली. दारूचे अतिसेवन आणि शक्तीवर्धक गोळ्यांच्या अतिसेवनामुळे तरूणाचा मृत्यू झाल्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केलीय. शवविच्छेदन अहवालानंतर तरूणाच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येईल. एएसपी अखिलेश रेनवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरूणाचे नातेवाईक आल्यानंतरच पोस्टमॉर्टम केले जाईल. पोलिसांनी मृत तरूणाच्या गर्लफ्रेंडला चौकशीसाठी ताब्यात घेतलं असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jamkhed Hotel Firing: ...तो रोहित पवार मी नाहीच! जामखेड गोळीबार घटनेनंतर आमदार रोहित पवार म्हणाले, Don’t Worry..! I am Fine!

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंची विकेट पडली; आता नंदुरबारचा पालकमंत्री कोण? या ५ मंत्र्यांची नावं चर्चेत

पंढरपुरातील विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज; वज्रलेपासाठी परवानगी रखडली|VIDEO

एक कॅप्सूल, पाण्याचं पेट्रोल? पेट्रोलसाठी पंपावर जाण्याची गरज नाही?

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंचं काय होणार? कोकाटे वादाच्या चक्रव्युहात?

SCROLL FOR NEXT