Heart Attack Death Saam TV
देश विदेश

Heart Attack Death : जीममध्ये ट्रेडमिलवर धावताना तरुणाचा हार्ट अटॅकने मृत्यू, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

Viral Video : सिद्धार्थ कुमार असं मृत तरुणाचं नाव आहे.

प्रविण वाकचौरे

Uttar Pradesh News :

बदलत्या जीवनशैलीमुळे तरुणांमध्ये हार्ट अटॅकचं म्हणजे हृदयविकाराच्या झटक्याचं प्रमाण वाढत आहे. गाझियाबादमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. घटनेचा मन सुन्न करणारा व्हिडीओ देखील समोर आला आहे.

सिद्धार्थ कुमार असं मृत तरुणाचं नाव आहे. सिद्धार्थ खोडा परिसरातील एका जिममध्ये ट्रेड मिलवर धावत असतानाचा त्याला हृदयविकाराचा झटका आला.

ट्रेड मिलवर धावत असताना सिद्धार्थची प्रकृती अचानक बिघडली. त्यानंतर तो ट्रेडमिलवरच खाली पडला. सिद्धार्थ खाली पडल्याचं पाहून जीममधील काही जण त्याच्या मदतीला धावून आले. (Viral VIdeo)

मूळचा बिहारमधील सिवान जिल्ह्यातील सिद्धार्थ कुमार वडिलांसोबत खोडा येथे राहत होता. सिद्धार्थने यावर्षी पदवीला प्रवेश घेतला होता. (Latest News Update)

सिद्धार्थ गेल्या सहा महिन्यांपासून खोडा येथील या जीममध्ये जात होता. शनिवारी सकाळी 11.10 वाजता तो जीमला गेलो. ट्रेडमिलवर धावत होता आणि अचानक खाली पडला. जीममधील इतर दोन तरुण सिद्धार्थच्या मदतीला धावून आले.

दोघांनी सिद्धार्थला उचलून तातडीने खासगी रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांना त्याला मृत घोषित केले. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Politics : बडा खेला हो गया! मतदानाच्या आदिल्या दिवशीच मोठा गेम; 'जन सुराज'च्या नेत्याचा उमेदवारी सोडून भाजपमध्ये प्रवेश

Maharashtra Live News Update: शरद पवारांचा मोठा निर्णय! भाजपसोबत युती नाही

Mangal Shukra Yuti 2025: 18 महिन्यांनी बनणार मंगळ-शुक्राचा संयोग; 'या' ३ राशींच्या नशीबी पैसाच पैसा

Breast Shape Change: स्तनाच्या आकारात झालेला बदल शरीराचा गंभीर इशारा असू शकतो! कॅन्सरच्या शक्यतेकडे दुर्लक्ष नको

QR Code : बनावट क्यूआर कोड कसा ओळखावा? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT