Telangana News Saam TV
देश विदेश

Telangana News : मोबाईल चार्ज करताना अचानक लागला करंट; तरुणाचा जागीच मृत्यू

Electric Shock While Charging Mobile : मोबाईल फोन चार्जिंग करताना एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तेलंगनामध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. कामारेड्डी गावात एका तरुणाचा विजेचा झटका लागल्याने मृत्यू झाला आहे. हा तरुण स्वत:चा मोबाईल फोन चार्ज करत होता. त्यावेळी त्याला विजेचा जोरदार झटका बसला आणि जागीच त्याचा मृत्यू झाला. सदर घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अनिल मलोथ असं मृत तरुणाचं नाव आहे. तो फक्त २३ वर्षांचा होता. कामारेड्डी गावातील सदाशिवनगर मंडल याचारम येथे राहत होता. शुक्रवारी रात्री ही धक्कादायक घडना घडली. तरुण झोपलेला असताना त्याला फोन चार्जींगला लावायचा होता. मात्र प्लग त्याच्यापासून दूर होता. त्यामुळे त्याने बेड चार्जिंग बोर्ड जवळ ठेवला आणि फोन चार्जिंगला लावला.

फोन चार्जिंगला लावून त्याने वायर आपल्या उशी खाली ठेवली आणि तो झोपला. रात्री फोन चार्च होत असताना त्याचा हात अचानक वायरला लागला आणि त्याला जोरदार करंट बसला. यामुळे तरुणाचा जागीच मरण आले. तरुणाला करंट लागल्याचे समजताच त्याच्या कुटुंबियांनी जवळच्या रुग्णालयात धाव घेतली. मात्र तेथून त्याला सरकारी रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला. तेथे गेल्यावर डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केलं.

तरुणांचे मोबाईल फोन वापरण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले आहे. त्यामुळे फोनचा करंट लागण्याच्या घटना देखील वाढल्या आहेत. मोबाईल फोन, ब्लुटूथ, हेडफोन अशा उपकरणांचा वापर करताना योग्य ती काळजी घेतली पाहिजे. फोनचा वापर कमी वेळ केला पाहिजे. चार्जिंग करताना फोन जवळ ठेवू नये. हेडफोन आर्धा तासाच्या वर वापरू नयेत. कामात त्याचा वापर करावा लागत असेल तर आर्ध्या तासाने ब्रेक घ्यावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : उल्हासनगरमध्ये ऑफिस खुर्ची बनवणाऱ्या कारखान्याला मध्यरात्री भीषण आग

Morning Motivation : सकाळी स्वत:ला या ५ सवयी लावा, आयुष्यात खुप पुढे जाल

Donald Trump: अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्पविरोधात मोठं आंदोलन, 70 लाख आंदोलक रस्त्यावर , नेमकं कारण काय?

Liver disease warning: लिव्हर खराब झाल्यावर त्वचेवर दिसतात 'हे' बदल; गंभीर गुंतागुंत होण्यापूर्वी लक्ष द्या

Manoj Jarange Effect : जालना पोलिस पाटील भरतीत ‘जरांगे इफेक्ट’! मराठा समाजाच्या उमेदवारांचा डंका

SCROLL FOR NEXT