Car Accident Yandex
देश विदेश

Car Accident: लग्नाच्या महिनाभरातच संसार उद्ध्वस्त; पतीचा अपघाती मृत्यू, पत्नीसह कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर

Young Man Died In Car Accident: गोला गावात कारने धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला आहे. या तरूणाचं एक महिन्यापूर्वीच लग्न झालं होतं.

Rohini Gudaghe

Car Accident In Ajmer

अजमेरमधील मांगलियावास नजीकच्या गोला गावात दुचाकी चालवणाऱ्या तरुणाचा कारने धडक दिल्याने मृत्यू (Car Accident) झाला. मिळालेल्या माहितीनुसार, गोला येथील पृथ्वीराज खेडा येथील भैरू गुर्जर यांचा मुलगा संजय (26) हा मोटारसायकलवरून त्याच्या गावाकडे येत होता.  (Accident News)

दरम्यान, गोला गावात त्याला भरधाव कारने धडक दिली. त्यामुळे तो रस्त्यावर पडला. तेथून जाणाऱ्या ग्रामस्थांनी त्याला पिसांगण येथील रुग्णालयात नेलं. रूग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित (Accident News) केलं. अपघातानंतर कार चालकाने आपल्या वाहनासह घटनास्थळावरून पळ काढला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दुचाकीस्वाराला कारची धडक

अपघाताची माहिती मिळताच मंगळवेढा पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मयताचा मेहुणा गोपाल गुर्जर याच्या तक्रारीवरून पोलिसांनी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला (Car Accident In Ajmer) आहे. त्यांनी पुढील तपास सुरू केला. पोलिसांनी बुधवारी शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

गोला येथील रहिवासी बबलू गुर्जर, पटवारी पोलुराम आणि रामनाथ गुर्जर यांनी पत्रिका डॉट कॉमसोबत बोलताना सांगितलं की, अपघातात मृत्युमुखी पडलेल्या संजयचे एक महिन्यापूर्वीच १३ फेब्रुवारी रोजी लग्न झालं (Young Man Died In Car Accident) होतं. लग्नात वधू-वरांच्या हातावर लावलेली मेहंदीही निघाली नाही, तेच त्यांचा संसार उद्धस्त झाला.

पतीचा अपघाती मृत्यू

या अपघातामुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हिम्मत सिंह राठोड यांनी सांगितले की, संजयच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. संजय कुटुंबातील एकमेव कर्ता पुरुष (Car Accident News) होता. आता त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या पश्चात आई आणि बायको उरली आहेत. संजयला दोन बहिणीही आहेत. संजयच्या मृत्यूची बातमी समजताच संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

लग्नाच्या महिनाभरातच त्यांचा संसार उद्ध्वस्त झाला (latest accident news) आहे. पतीचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे पत्नीसह कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rajyog 2025: गजकेसरी आणि कलात्मक राजयोगामुळे फळफळणार 'या' राशींचं नशीब; उत्पन्नाचे नवे मार्ग होणार खुले

Crime News: ओळखपत्र,मोबाईल हिसकावला नंतर खांबाला बांधलं; ड्युटीवर निघालेल्या लष्कर जवानासोबत टोल कर्मचाऱ्यांचं संतापजनक कृत्य

Pregnancy Tips : गर्भावस्थेतील मधुमेह नियंत्रणात ठेवणे का आवश्यक आहे?

Pandharpur: डॉल्बीच्या आवाजामुळे एकाचा मृत्यू, दंहीहंडीचा कार्यक्रम पाहायला आला अन्...; पंढरपुरात खळबळ

Hair Loss Remedie : टक्कल पडण्याची समस्या? हे घरगुती उपाय करतील मदत

SCROLL FOR NEXT