social media influencer death Saam tv
देश विदेश

Shocking : प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचा भीषण अपघातात मृत्यू; शरीराचे झाले दोन तुकडे

social media influencer death : प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचा भीषण अपघातात मृत्यू झालाय. रस्त्यावर अपघातात त्याच्या शरीराचे दोन तुकडे झाले.

Vishal Gangurde

१८ वर्षीय इन्फ्लुएन्सर प्रिन्स पटेलचा भीषण अपघातात मृत्यू

नियंत्रण सुटलेल्या दुचाकीची डिव्हायडरवर धडक, अपघाताचा सीसीटीव्ही फुटेजमध्ये समोर

हेल्मेट न घातल्यामुळे प्रिन्सचा अपघाती मृत्यू

गुजरातच्या सूरतमध्ये सोशल मीडियावर खतरनाक स्टंटसाठी प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरबाबत धक्कादायक वृत्त हाती आलं आहे. १८ वर्षीय प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर प्रिन्स पटेल याचा भीषण अपघातात मृत्यू झाला आहे.

गुजरातच्या उधना-मगदल्ला रोडजवळील अणुव्रत गेटच्या ओव्हरब्रिजवर अपघाताची घटना घडली आहे. इन्फ्लुएन्सर प्रिन्सच्या अपघाताचा सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे की, 'इन्फ्लुएन्सरने दुचाकीवरील नियंत्रण गमावलं. त्यानंतर रस्त्यावर कोसळून डिव्हाडरवर धडकला'.

प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, भीषण अपघातात इन्फ्लुएन्सर प्रिन्सला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर पुढील काही वेळात प्रिन्सचा जागीच मृत्यू झाला. प्रिन्सचा अपघात पाहून प्रत्यक्षदर्शी देखील हादरून गेले होते. त्याने दुचाकी चालवताना हेल्मेट न घातल्यामुळे मृत्यू झाल्याचे पोलीस तपासात समोर आलं आहे.

प्रिन्स पटेल यांनी सोशल मीडियावर 'PKG Blogger' नावाने अॅक्टिव्ह होता. तो त्याच्या KTM बाईकला प्रेमाने लैला बोलायचा. तो स्टंट आणि वेगाने बाईक चालवण्याचा रील तयार करायचा. दोन दिवसांपूर्वी प्रिन्स पटेल याने रील बनवला होता. त्याने स्वर्गाविषयी रील बनवला होता. त्याने स्वर्गाचा रील बनवल्यानंतर दोन दिवसांनी दुर्दैवाने मृत्यू झाला आहे.

प्रिन्स पटेलच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. प्रिन्स एकुलता एक होता. त्याची आई दूध विक्री करून कुटुंबाचा उदारनिर्वाह करत होती. प्रिन्स मोठा झाल्यावर कुटुंबाचा आधार होईल, असे तिच्या आईला वाटत होते. मात्र, वेगाने घराचा आधार हिरावून घेतला. दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या प्रिन्सचा मृत्यू झाल्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर आदित्य आणि राज ठाकरेंची भेट, नेमकी काय चर्चा झाली? VIDEO

बदलापुरात मोठा राडा; भाजप कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला, कार्यालयही फोडलं, VIDEO

राजकारणातील मोठी घडामोड; शिंदे गटाची प्रकाश आंबेडकरांकडे मदतीसाठी हाक, नेमकं काय घडलं?

हातातला नायलॉन मांजा गळ्यापर्यंत! दोर पतंगाची कापायची की आयुष्याची?

डोंबिवलीत 'महायुती'त रक्ताचा सडा, पैसे वाटपावरून भाजप- शिंदेसेनेत राडा

SCROLL FOR NEXT