Yasin Malik
Yasin Malik Saam TV
देश विदेश

Yasin Malik: टेरर फंडिंग प्रकरणी यासिन मलिकला जन्मठेप

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली: काश्मिरी फुटीरतावादी नेता यासिन मलिक (Yasin Malik) याला एनआयएच्या विषेश कोर्टाने आज जन्मठेप आणि १० लाखांची शिक्षा सुनावली आहे. यासिन हा जम्मू आणि काश्मीर लिबरेशन फ्रंटचा प्रमुख असून, त्याला टेरर फंडीग (Terror Funding Case) प्रतिबंध कायद्यांतर्गत दहशतवादी कारवायांसाठी पैशांचा पुरवठा केल्या प्रकरणी सर्व आरोपांत दोषी ठरवलं होतं. याच सर्व प्रकरणात आता यासिन मलिक याला एनआयएच्या कोर्टाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

हे देखील पाहा -

मागील आठवड्यात दिल्ली न्यायालयाने यासिन मलिकला दोषी ठरवले होते. त्याला टेरर फंडिंग प्रकरणात बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंध कायदा (UAPA) अंतर्गत केलेल्या सर्व आरोपांसह दोषी ठरवले होते. विशेष न्यायाधीश प्रवीण सिंग यांनी एनआयए अधिकाऱ्यांना दंड ठोठावण्यासाठी यासीन मलिकच्या आर्थिक स्थितीचे मूल्यांकन करण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार आज या प्रकरणाची एनआयएच्या (NIA) विशेष न्यायालयात सुनावणी झाली या सुनावणी दरम्यान मलिकला जन्मठेप आणि १० लाखांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

यासिनवर काय आहेत आरोप ?

काश्मिरी फुटीरतावादी नेता यासिन मलिक याच्यावर UAPA चे कलम 18 अंतर्गत, दहशतवादी कृत्य करण्याचा कट आणि कलम २० अंतर्गत, दहशतवादी टोळी किंवा संघटनेचा सदस्य असणे तसंच देशद्रोहाचे आरोप ठेवण्यात आले होते. हे प्रकरण २०१७ मध्ये काश्मीर खोऱ्यातील कथित दहशतवाद आणि फुटीरतावादी कारवायांशी संबंधित होते. तसंच त्याच्यावर १९९० साली भारतीय हवाई दलाच्या जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा देखील आरोप आहे. तसंच जम्मू काश्मीरमधील तरुणांची माथी भडकवण्याचा आणि हातात बंदूक घेण्यास प्रेरीत केल्याचाही आरोप त्याच्यावरती आहेत.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Lok Sabha: कल्याण लोकसभा मतदारसंघात राज ठाकरेंची सभा झाली तर आनंदच: श्रीकांत शिंदे

Maharashtra Politics: नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरेना? ठाकरेंच्या उमेदवाराची घौडदौड सुरुच

Maharashtra Politics 2024 : काँग्रेसचा विश्वजीत पैलवानासोबत; चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सक्रीय

Maharashtra Politics 2024 : माढ्याच्या मैदानात फडणवीसांचा डबल धमाका; मोहिते- पवारांच्या गटात लावला सुरुंग

Health Tips: लसणाचे पाणी पिण्याचे फायदे ऐकून आजपासूनच प्यायला कराल सुरूवात

SCROLL FOR NEXT