yashwant sinha
yashwant sinha Saam Tv
देश विदेश

Presidential Election: ठरलं! यशवंत सिन्हा विरोधी पक्षांचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार

Nandkumar Joshi

नवी दिल्ली: राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी (President Election 2022) विरोधी पक्षांनी संयुक्त उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे. राष्ट्रपतीपदासाठी यशवंत सिन्हा हे संयुक्त उमेदवार असणार आहेत. याबाबत काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी माहिती दिली.

यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) हे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार असतील, यावर विरोधी पक्षांनी सर्वसंमतीने निर्णय घेण्यात आला आहे. सिन्हा हे माजी केंद्रीय मंत्री आहेत. विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारासाठी सिन्हांच्या नावाचा विचार सुरू होता. आता त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

काही विरोधी पक्षांनी राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून गेल्या वर्षी तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झालेले भाजपचे माजी नेते सिन्हा यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. त्यांच्या नावावर सर्वांनीच सहमती दर्शवली. विरोधी पक्षांच्या एकीसाठी काम करणार असल्याचे सिन्हा यांनी सांगितले होते. सिन्हा यांनी मंगळवारी तृणमूल काँग्रेसचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर ट्विट केलं. ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये मला जो सन्मान दिला, त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे, असे ते म्हणाले होते.

शरद पवार-फारुख अब्दुल्ला यांना मिळाला होता प्रस्ताव

तत्पूर्वी, यशवंत सिन्हा यांच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपाल कृष्ण गांधी यांच्या उमेदवारीचा प्रस्ताव देण्यात आलेला होता. मात्र, या सर्वांनी विरोधी पक्षांकडून दिलेला प्रस्ताव नाकारण्यात आला.

तर यशवंत सिन्हा यांनी दोनदा केंद्रीय मंत्रिपद भूषवले आहे. पहिल्यांदा ते १९९० मध्ये चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये आणि त्यानंतर अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या काळात ते अर्थमंत्री होते. तसेच ते परराष्ट्र मंत्रीदेखील होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Narendra Modi: कलम ३७० पुन्हा लागू करण्याची कुणामध्येही हिंमत नाही; पंतप्रधान मोदी कडाडले

Bomb Threat Mailed To Nagpur Airport: नागपूर एअरपोर्ट बॉम्बने उडवणार, धमकीचा मेल; पोलिसांकडून मॉक ड्रिल

IPL मॅचचं बेकायदेशीर स्ट्रीमिंग प्रकरण, तमन्ना भाटियाने चौकशीसाठी मागितला वेळ

Heatwave Care: उष्माघाताच्या त्रासापासून वाचण्यासाठी 'अशी' काळजी घ्या

Today's Marathi News Live : नागपूर एअरपोर्ट बॉम्बने उडवू; धमकीच्या मेलने खळबळ

SCROLL FOR NEXT