China President Xi Jinping  Saam Tv
देश विदेश

Xi Jinping: ते पुन्हा आले! शी जिनपिंग यांची सत्तेची हॅट्रीक; तिसऱ्यांदा राष्ट्रपतीपद भूषवत बनवला 'हा' रेकॉर्ड

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

China President Xi Jinping News: भारताचा शेजारी असलेल्या चीन (People's Republic of China) या देशात शी जिनपिंग हे तिसऱ्यांदा सत्तेत आले आहेत. जिनपिंग ते सलग तिसऱ्यांदा देशाचे राष्ट्रपती म्हणून निवडले गेले आहेत. यामुळे जिनपिंग यांनी चीनच्या राजकारणावर आपली असलेली मजबूत पकड पुन्हा एकदा दाखवली आहे. (Xi Jinping News)

कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना काँग्रेसचे 20 वे अधिवेशन संपल्यानंतर शी जिनपिंग यांची पुन्हा राष्ट्रपतीपदी निवड झाली आहे. अपेक्षेप्रमाणे त्यांची सलग तिसऱ्यांदा पक्षाच्या सरचिटणीसपदीही निवड झाली आहे. चीनमध्ये, या पदासाठी निवडलेला नेता देशाचा राष्ट्रपती असतो आणि पीपल्स लिबरेशन आर्मी (PLA) चा कमांडर देखील असतो.

जिनपिंग यांच्या वर्चस्वामुळे पक्षाच्या तीन दशके जुन्या नियमाला तिलांजली

जिनपिंग तिसऱ्यांदा चीनचे राष्ट्राध्यक्ष बनल्याने पक्षाचा तीन दशके जुना नियमही मोडीत निघाला आहे. वास्तविक, चीनमध्ये 1980 नंतर सर्वोच्च पदावर 10 वर्षांच्या कार्यकाळाचा नियम करण्यात आला. मात्र, जिनपिंग यांना आणखी पाच वर्षे सत्तेवर ठेवण्यासाठी हा नियम बाजूला ठेवण्यात आला. (LIVE Marathi News)

जिनपिंग यांच्या नावावर विक्रम

दरम्यान जिनपिंग या वर्षी सीपीसी (Communist Party of China) प्रमुख आणि अध्यक्ष म्हणून 10 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करत आहेत. पक्षाचे संस्थापक माओ झेडोंग (Mao Zedong) यांच्यानंतर तिसऱ्यांदा सत्तेवर असणारे ते पहिले चिनी नेते ठरले आहेत. माओ त्से तुंग यांनी सुमारे तीन दशके चीनवर राज्य केले. तिसऱ्यांदा राष्ट्रपतीपद मिळवणे म्हणजे जिनपिंग यांचाही माओप्रमाणे आयुष्यभर सत्तेत राहण्याचा मानस आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. (Tajya Batmya)

पॉलिट ब्युरो राष्ट्रपतींवर निर्णय घेते

जिनपिंग हे चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीचे सदस्यही आहेत. या 25 सदस्यीय 'पॉलिट ब्युरो'ने निवडणुकीच्या आधारे चीनवर राज्य करण्यासाठी स्थायी समितीचे सात किंवा अधिक सदस्य निवडले. या समितीतून जिनपिंग यांची पक्षाचे सरचिटणीस म्हणूनही निवड झाली. त्यांच्याकडे पुढील पाच वर्षांसाठी पक्ष आणि देशाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

अनेक महत्त्वाच्या नेत्यांची नावे पॉलिट ब्युरोमधून गायब होती

विशेष म्हणजे केंद्रीय समितीच्या सदस्यांच्या यादीतून अनेक नेत्यांची नावे वगळण्यात आली. यामध्ये पंतप्रधान ली किंग (67), नॅशनल पीपल्स काँग्रेसचे अध्यक्ष ली झांशु (72), चायनीज पीपल्स पॉलिटिकल कन्सल्टेटिव्ह कॉन्फरन्सचे अध्यक्ष वांग यांग (67), माजी उपपंतप्रधान हान झेंग (67) यांचा समावेश आहे. हे सर्व नेते शी जिनपिंग यांच्या अध्यक्षतेखालील सात सदस्यीय स्थायी समितीचे सदस्य होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

SCROLL FOR NEXT