WWE Star Sara Lee Instagram/@saraann_lee
देश विदेश

Sara Lee News : WWE स्टार सारा लीचे निधन; अवघ्या ३० व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

Sara Lee Passes Away: ती २०१६ मध्ये एका लाइव्ह इव्हेंटमध्ये हील प्रोमोमध्ये दिसली होती.

वृत्तसंस्था

Sara Lee Death News: क्रीडा जगतातून एक दुःखद वृत्त समोर आलंय. वर्ल्ड रेसलिंग इंटरटेन्मेंट (WWE) ची माजी रेसलर सारा ली हिचं निधन (Died) झालं. अवघ्या ३० व्या वर्षी तिनं जगाचा निरोप घेतला. सारा लीच्या निधनाची माहिती तिच्या आईने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. साराच्या निधनानं तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. (Sara Lee Death News)

सारा ली (Sara Lee) हिच्या निधनाची माहिती तिच्या आईने सोशल मीडियाद्वारे दिली. WWE स्टार सारा लीच्या मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सारा लीच्या मृत्यूचे वृत्त समजताच, एलेक्सा ब्लिस, बॅकी लिंच, मिक फोली यांसारख्या दिग्गज मंडळींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दुःख व्यक्त केले.

WWE मध्ये सारा ली जवळपास एक वर्ष खेळली. ती २०१६ मध्ये एका लाइव्ह इव्हेंटमध्ये हील प्रोमोमध्ये दिसली होती. त्यानंतर काही दिवसांनी जानेवारीत सारा लीने सिक्स वुमेन्स टॅग टीम मॅचमध्ये इन-रिंग पदार्पण केलं होतं. त्याचवेळी त्यात मॅंडी रोजनेही सहभाग घेतला होता.

सारा ली ही WWE च्या रिअॅलिटी सीरीज टफ इनफच्या सहाव्या पर्वाची विजेती होती. २०१६ च्या अखेरीस सारा लीने शेवटचा सामना खेळला होता. ऑगस्टमध्ये सारा ली दुहेरी लढत खेळली होती. लिव्ह मॉर्गन हा तिच्यासोबत होता. आलिया आणि बिली यांच्याशी त्यांचा सामना झाला होता.

सारा ली ही सोशल मीडिया सेन्सेशनही होती. तिचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असत. सारा लीने पाच वर्षांपूर्वी WWW चा माजी सुपरस्टार वेज्ली ब्लॅकसोबत लग्न केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT