Wrestlers Meet Amit Shah Saam Tv
देश विदेश

Wrestlers Meet Amit Shah: आंदोलक कुस्तीपटूंनी घेतली अमित शाह यांची भेट, आता ब्रिजभूषण यांच्यावर काय कारवाई होणार?

Wrestlers Protest: आंदोलक कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

Priya More

Delhi News: भारतीय कुस्ती महासंघाचे प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंग (Bhushan Sharan Singh) यांच्याविरोधात कुस्तीपटुंचे आंदोलन सुरु आहे. या हे प्रकरण वाढतच चालले आहे. ब्रिजभूषण यांना अटक होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा या कुस्तीपटूंनी घेतला आहे. अशामध्ये त्यांनी रविवारी रात्री गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगट यांनी गृहमंत्री शाह (Amit Shah) अमित शाह यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी आंदोलक कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर कुस्तीपटूंनी आपली चिंता व्यक्त केली आणि या बैठकीमध्ये त्यांनी गृहमंत्र्यांना सर्व काही सांगितले. कुस्तीपटूंनी गृहमंत्र्यांकडे ब्रिजभूषण यांच्या विरोधात लवकरच आरोपपत्र दाखल करण्याची विनंती केली. परंतु सध्या कोणताही निर्णय झालेला नाही. कायदा सर्वांना समान आहे, कायद्याला त्याच काम करु द्या, असे आश्वासन अमित शाह यांनी कुस्तीपटूंना दिले. त्यामुळे ब्रिजभूषण यांच्याविरोधात लवकरच अटकेची कारवाई होणार असल्याची चिन्ह दिसत आहे.

अल्पवयीन विनेशसह अनेक महिला कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. या सर्वांनी कारवाईच्या मागणीसाठी दिल्लीच्या जंतरमंतरवर महिनाभर आंदोलन केले. पोलिसांनी कुस्तीपटूंचे हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. कुस्तीपटूंच्या आंदोलनासाठी जंतर-मंतरवर लावेलले तंबू, खुर्च्या हटवण्यात आल्या. तरी देखील त्यांनी आपले आंदोलन थांबवले नाही.

जोपर्यंत ब्रिजभूषण यांच्याविरोधात कारवाई होत नाही तोपर्यंत मागे हटणार नसल्याचे त्यांनी सांगितले. ब्रिजभूषण शरणसिंह यांच्यावर पॉक्सो कायद्यासह दोन प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाला असताना देखील त्यांना अटक का केली जात नाही असा सवाल करत कुस्तीपटू आक्रमक झाले आहेत. अशामध्ये ब्रिजभूषण यांनी त्यांच्यावर केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

ब्रिजभूषण यांनी सांगितले की, 'मी गुन्हेगार म्हणून राजीनामा देणार नाही. माझा सुप्रीम कोर्टावर पूर्ण विश्वास आहे. माझी कोणतीही तक्रार नाही. मी पूर्णपणे निर्दोष आहे. तपास यंत्रणा मला जिथे बोलावेल तिथे मी जायला तयार आहे. माझ्यावर अनेक महिन्यांपासून सातत्याने आरोप केले जात आहेत.' तसंच, 'मी आणि माझे कुटुंब अडचणीत आहोत. या प्रकरणाची लवकरात लवकर चौकशी व्हावी, अशी माझी इच्छा आहे. या लोकांची विधाने बदलत राहतात.' असे त्यांनी सांगितले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वसई-विरारमधील तलावांमध्ये पडून होणाऱ्या मृत्यूंच्या घटनांमुळे आंदोलन

Dry Day: पुण्यासह संभाजीनगर, नागपूर आणि अमरावतीत दारू विक्रीबंदी; किती तारखेपर्यंत बंद असणार दारूची दुकानं?

अमली पदार्थांच्या व्यसनाविरोधात पुणे पोलिसांचा अनोखा उपक्रम, तब्बल १२ जणांचे पुनर्वसन

Pradeep Purnekar Case : पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, नवीन व्हिडीओ आला समोर, मुलाचा खळबळजनक दावा

Rice Hacks : भात शिजवताना १ तमालपत्र नक्की घाला; मिळतील 'हे' ६ फायदे

SCROLL FOR NEXT