Ajit Pawar News: "…नाहीतर कानाखालीच आवाज काढीन", भर बैठकीत अजित पवारांनी कार्यकर्त्यांना झापलं, पाहा VIDEO

Ajit Pawar Latest News: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार नेहमी हटके स्टाईलने चर्चेत असतात. त्यांच्या बोलीभाषेतून ते जनतेशी संवाद साधतात. याशिवाय कार्यकर्त्यांनाही ते तशाच तशाच शब्दात मार्गदर्शन करतात.
Maharashtra political news ajit pawar slams ncp leaders and Workers watch video
Maharashtra political news ajit pawar slams ncp leaders and Workers watch videoSaam TV

Ajit Pawar Latest News: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार नेहमी हटके स्टाईलने चर्चेत असतात. त्यांच्या बोलीभाषेतून ते जनतेशी संवाद साधतात. याशिवाय कार्यकर्त्यांनाही ते तशाच तशाच शब्दात मार्गदर्शन करतात. आता तर थेट अजित पवार यांनी भर बैठकीत पक्षातील पदाधिकाऱ्यांना चांगलंच सुनावलं आहे.  (Latest Marathi News)

इतकंच नाही, तर एकदा सांगून ऐकलं नाही तर, कानाखालीही वाजवेन अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना सज्जड दम दिला आहे. येत्या १० जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन आहे. या वर्धापनदिनाची तयारी करण्यासाठी पुण्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ते बोलत होते.

Maharashtra political news ajit pawar slams ncp leaders and Workers watch video
Maharashtra Politics: शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताबाबत मोठी अपडेट; या मंत्र्यांची हकालपट्टी होणार? बैठकीत काय ठरलं?

कार्यकर्त्यांना काय म्हणाले अजित पवार?

'तुम्ही देखील मीटिंग घ्या, तयारी सुरू करा. आपल्यावर खूप मोठी जबाबदार आहे, मुळशीच्या लोकांनी देखील काम करायचं आहे. त्यांना देखील पद दिली आहेत. पदासाठी भांडायचं नाही, नाहीतर एका-एकाच्या कानाखाली आवाज काढीन, असं अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

'...तर पदाचा राजीनामा घेऊन टोकाचं वागेन'

“यातून तुमची बदनामी होत नाही. पवार साहेबांची (Sharad Pawar) बदनामी होते. हा कोणता फाजिलपणा सुरू आहे?” असा प्रश्नही अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांना विचारला. त्याचबरोबर मला यापुढे असं काही दिसून आलं, तर पदाचा राजीनामा घेणार आणि टोकाचा वागेन फार, असंही अजित पवार म्हणाले.

Maharashtra political news ajit pawar slams ncp leaders and Workers watch video
Gopichand Padalkar News: शरद पवारांवर टीका करताना गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली; थेट अरे तुरेची वापरली भाषा

'अशा घटना अजिबात घडता कामा नयेत'

एकदा तुम्ही पदाधिकारी झाल्यानंतर तुमच्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टीकोन बदलतो. तुम्ही राष्ट्रवादी संघटनेचे पदाधिकारी म्हणून त्या पदावर बसता. त्यातच तुम्ही काही भानगड केली तर लोकं याचे व्हिडीओ बनवता. त्यामुळे त्यामुळे केलेल्या कामाचा सत्यानाश होतो. केलेल्या कामावर पानी फिरवता, अशा घटना अजिबात घडता कामा नयेत, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. (Maharashtra Political News)

'कुणाचीही गय केली जाणार नाही'

पक्षातील सर्वानी लक्षात ठेवा. मतभेद असतात. पण आपल्यासोबत चांगला इतिहास, परंपरा असताना आपण पक्षाची बदनामी का करायची? पक्षाची बदनामी करणाऱ्या कुणाचीही गय केली जाणार नाही. पक्षाची बदनामी करणाऱ्यांना मी सोडणार नाही. मी त्यांच्याकडून सगळी पद आणि जबाबदाऱ्या काढून घेईल असंही पवार यावेळी म्हणाले आहेत.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com