Maharashtra Politics: शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठी अपडेट; या मंत्र्यांची हकालपट्टी होणार? बैठकीत काय ठरलं?

Maharashtra Government Cabinet Expansion: राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Shinde-Fadnavis Government Cabinet Expansion Date
Shinde-Fadnavis Government Cabinet Expansion DateSaam TV
Published On

Shinde-Fadnavis Government Cabinet Expansion Date: राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. येत्या १९ जून रोजी सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. याशिवाय सध्याच्या मंत्रिमंडळातील वाचाळवीर मंत्र्यांची सुद्धा हकालपट्टी केली जाणार असल्याची माहिती आहे.  (Latest Marathi News)

Shinde-Fadnavis Government Cabinet Expansion Date
Gopichand Padalkar News: शरद पवारांवर टीका करताना गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली; थेट अरे तुरेची वापरली भाषा

गेल्या काही दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या तारखावर तारखा समोर येत आहेत. त्यातच काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत राज्य मंत्रीमंडळ विस्तारावर चर्चा झाली.

शिवसेनेच्या वर्धापन दिना आधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करायला हवा असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा झाल्यास तो १९ जून रोजी होऊ शकतो.  (Maharashtra Political News)

Shinde-Fadnavis Government Cabinet Expansion Date
BJP Leader's Criticism: 'गद्दार ते गद्दारच शेवटी', भाजप नेत्याच्या शिवसेना खासदारावरील टीकेने खळबळ

सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच केला जाणार आहे. भाजपच्या मिशन ४५ ला फायदेशीर असणाऱ्या नेत्यांचीच मंत्रीपदी वर्णी लागू शकते, याशिवाय ज्या मंत्र्यांमुळे सरकारला टीकेला सामोरं जावं लागलं, अशा मंत्र्यांची सुद्धा मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली जाईल, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, राज्यमंत्रीमंडळ विस्ताराआधी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार करण्याचा देखील केंद्रीय नेतृत्वाचा विचार असून या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात शिंदेच्या दोन खासदारांची वर्णी लागू शकते. यावरही अमित शहा यांची या दोन्ही नेत्यासोबत चर्चा झाली. रात्री उशिरा मुख्यमंत्री मुंबईत परतले तर देवेंद्र फडणवीस नागपुरच्या दिशेने रवाना झाले आहेत.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com