Worlds Oldest Man Dies Saam Tv
देश विदेश

Shocking: ३ लग्न, १३४ मुलं अन् नातवंडं, ११० व्या वर्षी झाले होते बाबा; आता १४२ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

Worlds Oldest Man Dies: जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्तीचे निधन झाले. वयाच्या १४२ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांनी ३ लग्न केली होती तर त्यांना १३४ मुलं आणि नातवंडं आहेत. त्याच्या निधनानंतर देशात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Priya More

Summary -

  • सौदी अरेबियातील १४२ वर्षांच्या वृद्ध व्यक्तीचे निधन

  • ३ लग्न, १३४ मुलं आणि नातवंडांचा आहे परिवार

  • ११० व्या वर्षी बाबा होऊन जगाला केलं होतं आश्चर्यचकित

  • निधनानंतर संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात आहे

जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्तीचे १४२ व्या वर्षी निधन झाले. नासेर बिन रादान अल रशीद अल वदाई असं या व्यक्तीचे नाव होते आणि ते सौदी अरेबियातील होते. त्यांना सौदी अरेबियातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती मानले जात होते. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नासेर बिन रादान अल रशीद अल वदाई यांनी १४२ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्यांना देशातील सर्वात वृद्ध व्यक्ती मानले जात होते. त्यांचा जन्म १८०० च्या उत्तरार्धात झाला होता असा दावा केला जात आहे. तेव्हा सौदी अरब नावाचा देश देखील अस्तित्वात नव्हता. असे असले तरी देखील गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स या व्यक्तीला सर्वात वृद्ध व्यक्ती म्हणून ओळखत नाही.

नासेर बिन रादान अल रशीद अल वदाई यांचे वैयक्तीक आयुष्य देखील खूप चर्चेत राहिले. त्यांनी ३ लग्न केले होते आणि त्यांना १३४ मुलं आणि नातवंड आहेत. त्यांची तिसरी बायको ११० वर्षांपर्यंत जिवंत होती आणि ती ३० वर्षे त्यांच्यासोबत राहिली. शेख नासर अल वदाई यांनी ११० व्या वर्षी तिच्यासोबत लग्न केले होते आणि ते तेव्हा बाबा देखील झाले होते. त्यांना मुलगी झाली होती. या वयामध्ये वडील होणं हे जगाला आश्चर्यचकीत करणारी गोष्ट होती. त्यांची अनेक मुलं अजूनही जिवंत आहेत.

नासेर बिन रादान अल रशीद अल वदाई यांच्या कुटुंबीयांनी सांगितले की, त्यांनी अत्यंत साधे जीवन जगत होते. ते त्यांच्या दृढ विश्वासासाठी ओळखले जात होते आणि त्यांनी ४० पेक्षा जास्त वेळा हज यात्रा केल्या होत्या. त्यांच्या दीर्घ आयुष्याचे रहस्य साध्या खाण्याच्या सवयी आणि पारंपारिक जीवनशैलीत आहे असा त्यांचा विश्वास होता. त्याच्या मृत्यूनंतर धरन अल जनुब येथे झालेल्या अंतिम प्रार्थनेला जवळपास ७ हजारांपेक्षआ जास्त जण उपस्थित होते. नंतर त्यांना त्यांच्या मूळ गावी अल रशीद येथे दफन करण्यात आले. सोशल मीडियावर नेटकरी त्यांना विश्वास, संयम आणि साधेपणाचे प्रतीक म्हणत आहेत.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सनुसार, जगातील सर्वात वृद्ध जिवंत व्यक्ती ब्राझीलचे रहिवासी जोआओ मारिनो नेटो आहेत. त्यांना २६ नोव्हेंबर २०२४ रोजी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड अवॉर्ड मिळाला होता. त्यावेळी त्यांचे वय ११२ वर्षे आणि ५२ दिवस होते. तर गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सनुसार, सर्वात वयोवृद्ध व्यक्ती जपानचा रहिवासी जिरोएमोन किमुरा होता. त्यांचा जन्म १९ एप्रिल १८९७ रोजी झाला आणि १२ जून २०१३ रोजी ११६ वर्षे ५४ दिवसांच्या वयात त्यांचे निधन झाले. २८ डिसेंबर २०१२ रोजी त्यांना सर्वात वयोवृद्ध व्यक्ती म्हणून अवॉर्ड दिला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Furniture Design: घराच्या शोभेसाठी हे आहेत 5 स्पेस-सेव्हिंग फर्निचर डिझाईन्स

Maharashtra Elections Result Live Update : पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपची मोठी झेप

Mumbai Street Food Recipes: मुंबईत फिरायला आलात? 'हे' 5 पदार्थ एकदा खाऊन पाहाच

Jalgaon Municipal Election: शिंदेंच्या उमेदवाराने जेलमधून जिंकली निवडणूक; माजी महापौर ललित कोल्हेंसह कुटुंबातील दोघेजण विजयी

फडणवीसांनी दत्तक घेतलेल्या भाजपच्या बालेकिल्ल्यात शिंदेंचा वरचष्मा, अख्खं पॅनलच वनसाईड विजयी

SCROLL FOR NEXT