

Owaisi reaction on Navneet Rana population statement : एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसींनी माजी खासदार नवनीत राणांवर जोरदार हल्लाबोल केलाय.. तुम्ही चार नव्हे, तर आठ मुले जन्माला घाला, असा टोला त्यांनी लगावला आहे... हिंदूंनी किमान 4 मुलं जन्माला घालावीत असं नवनीत राणा म्हणाल्या होत्या त्यावर आता ओवैसींनी पलटवार केला. तुम्ही चार नाही तर २० मुलं जन्माला घाला, आम्हाला काय करायचे आहे, असा टोला त्यांनी लगावला. दरम्यान, भारत हा तरुणांचा देश आहे आणि मोठ्या प्रमाणावर 40 वर्षांखालील तरुणांची संख्या आहे. ”त्यांना तुम्ही नोकऱ्या देत नाहीत. मोदी म्हणतात की आम्ही नोकर्या नाही देऊ शकत तुम्ही गोरक्षक बना, असाही टोला त्यांनी यावेळी लगावला.
अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एमआयएमच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी एमआयएमचे नेतेही महाराष्ट्रातील प्रचारात सक्रीय झाले आहेत. असदुद्दीन ओवैसी यांनी रविवारी अमरावती येथे जाहीर सभा घेतली. त्यावेळी, बोलताना भाजप नेत्या नवनीत राणा यांच्या वक्तव्यावरुन पलटवार केला. एक मौलाना म्हणाला, मला चार बायका आणि 19 मुलं आहेत. मी प्रत्येक हिंदू व्यक्तीला आव्हान करते की, ते 19 मुलं जन्माला घालत असतील तर आपण किमान चार मुलं जन्माला घातली पाहिजेत, असे भाजप नेत्या नवनीत राणा यांनी म्हटलं होतं. आता, अमरावतीत निवडणूक प्रचार सभेदरम्यान, असदुद्दीन ओवैसी यांनी नवनीत राणांवर पलटवार केला आहे. तुम्ही चार नाही, २० मुलं करा, आम्हाला काय करायचं, असे म्हणत नवनीत राणा यांनी हिंदूंना मुले जन्माला घालण्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन ओविसी यांनी टीका केली.
याच सभेत ओवैसींनी अजित पवारांचाही चांगला समाचार घेतला. ते म्हणाले, “अजित पवारांकडे बोलण्यासाठी आता काही उरलेलं नाही. आधी त्यांनी राज्यासाठी काय केलं ते सांगा.” महाराष्ट्रातील मॉब लिंचिंगचा मुद्दा उपस्थित करत ओवैसींनी २०१४ मधील जळगाव येथील मोसिन शेख प्रकरणाचा उल्लेख केला आणि या प्रकरणात न्याय न मिळाल्याचा आरोप केला. “गुन्हा झाला, केस संपली पण न्याय मिळाला नाही,” असे ते म्हणाले. मात्र अमरावतीमध्ये इथले लोक म्हणतात “दादा बोलले, दादा बोलले पण दादा कोण आहे हे माहीत आहे का?,” अशी टीका त्यांनी केली. राज्यात कायदा-सुव्यवस्था, अल्पसंख्यांकांची सुरक्षा आणि न्याय या मुद्द्यांवर सरकार उत्तर देत नसल्याचा आरोप करत त्यांनी सत्ताधाऱ्यांना थेट जबाबदारी स्विकारण्याचे आव्हान दिले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.