Ice Cream Price: आईस्क्रीम (Ice Cream) खायला सर्वांनाच आवडते. आतापर्यंत तुम्ही 10 रुपयांपासून ते 100 रुपयांपर्यंत आईस्क्रीम खाल्ली असेल. साधारण हजार ते 10 हजार रुपयांची आईस्क्रीम असू शकते असे सांगितले तर तुम्हाला काही विशेष वाटणार नाही. पण जर तुम्हाला एखाद्या आलिशान कारच्या किमती इतक्या आईस्क्रीमबद्दल सांगितले तर विश्वास बसणार नाही ना. पण हे खरं आहे. सध्या एका आईस्क्रीमच्या किमतीने जागतिक विक्रम नोंदवला आहे. या आईस्क्रीमची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली आहे. या आईस्क्रीममध्ये असं काय आहे आणि त्याची किंमत किती आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत....
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने ट्वीटरवर एका पोस्टद्वारे या आईस्क्रीमबद्दल सांगितले आहे. जपानच्या आइस्क्रीम ब्रँड सेलाटोने आइस्क्रीमची एक खास व्हरायटी आणली आहे. ही आईस्क्रीम तयार करण्यासाठी अशा अनेक गोष्टींचा वापर करण्यात आला आहे ज्या जगात शोधणे खूप कठीण आहे. त्यामुळेच या आइस्क्रीमची किंमत आश्चर्य वाटण्यासारखी आहे.
हे आइस्क्रीम खाण्यासाठी तुम्हाला 8,73,400 जपानी येन खर्च करावे लागतील. भारतीय चलनानुसार या आईस्क्रीमची किंमत तब्बल 5.20 लाख रुपये इतके आहेत. या आईस्क्रीमच्या किमतीत तुम्ही मारुती सुझुकीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारपैकी एक असलेल्या अल्टोचे नवीन मॉडेल खरेदी करू शकता.
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सनुसार, सेलाटो आइस्क्रीमची किंमत जास्त असण्यामागचं कारण ते तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य आहे. यामध्ये इटलीच्या अल्बामध्ये उगवलेला पांढरा ट्रफल टाकण्यात आला आहे. ज्याची किंमत 2 दशलक्ष जपानी येन म्हणजेच सुमारे 15,192 डॉलर प्रति किलोग्रॅम आहे. याशिवाय सेलेटो आईस्क्रीम तयार करण्यासाठी परमिगियानो रेगियानो आणि सेक लीक्स सारख्या दुर्मिळ घटकांचा वापर करण्यात आला आहे.
जगातील सर्वात महागड्या या आईस्क्रीमचे नाव 'ब्याकुया' असे ठेवले आहे. सेलाटो सांगतात की, त्यांनी जगातील सर्वात महागडे आईस्क्रीम बनवण्याचा प्रयत्न केला नाही, तर युरोप आणि जपानमधील पारंपरिक आणि दुर्मिळ पदार्थ एकाच आईस्क्रीममध्ये एकत्र करण्याचा प्रयत्न केला आहे.
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड (@GWR) नावाच्या अधिकृत ट्वीटर हँडलवर ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे. 18 मे रोजी शेअर केलेल्या या आईस्क्रीमच्या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. यासोबतच 2 हजारांहून अधिक युजर्सनी या व्हिडिओला लाइक सुद्धा केले आहे. सोशल मीडियावर अनेकांनी ही अनोखी आणि महागडी आईस्क्रीम खाण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.