Trains  Saam tv
देश विदेश

Delhi to Mumbai : दिल्ली ते मुंबई अंतर फक्त ३ तासात, जगातील सर्वात वेगवान ट्रेन कोणती? वंदे भारत आसपासही नाही

World's Fastest Train vs India’s Vande Bharat : जपानमधील SC मॅगलेव्ह ट्रेन ६०३ किमी प्रतितास वेगाने धावते. भारतातील वंदे भारत, राजधानी यांच्याशी तुलना करता ती कितीतरी पुढे आहे. चीनची CR450 देखील ४५० किमी प्रतितास वेगाने चाचणीमध्ये धावली.

Namdeo Kumbhar

World’s Fastest Trains : जगातील सर्वात वेगवान ट्रेन कोणत्या देशात आहे? याबाबत तुम्हाला माहितेय का? भारतात धावणाऱ्या वंदे भारत, राजधानी, तेजस, शताब्दी यासारख्या एक्सप्रेसपेक्षाही ही ट्रेन वेगात धावतेय. जपानमध्ये धावणारी SC Maglev ही ट्रेन जगातील सर्वात वेगवान आहे. या एक्सप्रेसचा वेग प्रतिदास ६०३ किमी इतका आहे. SC Maglev हायस्पीड गाडीसमोर भारतामधील रेल्वे गाड्या आसपासही नाहीत.

मागील २० वर्षांपासून भारतीय रेल्वेमध्ये खूप काही बदल झाले आहेत. अनेक हायस्पीड रेल्वे आल्या आहेत. वंदे भारत, राजधानी एक्सप्रेस , तेजस एक्सप्रेस, शताब्दी एक्सप्रेस धावत आहेत. या गाड्यामध्ये आरामदायी प्रवास होतोय, त्याशिवाय वेळ वाचत आहेत. या हायस्पीड रेल्वेचा वेग प्रतितास १३० ते १८० किमी इतकाच आहे. पण या एक्सप्रेस जगातील सर्वात वेगवान रेल्वे नाहीत. भारता धावणाऱ्या एक्सप्रेसपेक्षाही जगात अधिक वेगाने धावणाऱ्या रेल्वे आहेत. चीन, जपानमध्ये धावणाऱ्या रेल्वे जगात सर्वात वेगवान असल्याच्या समोर आलेय.

चीन रेल्वेने नुकतीच सीआर ४५० या हायस्पीड रेल्वेची चाचणी केली. रिपोर्ट्सनुसार, या रेल्वेचा वेग प्रतितास ४०० ते ४५० इतका आहे. चीनच्या मते ही जगातील सर्वात वेगवान ट्रेन आहे. चीन रेल्वेने केलेल्या दाव्यानुसार, त्यांनी फुजियान प्रांतात सर्वात वेगवान, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक हाय-स्पीड ट्रेनची यशस्वी चाचणी केली. ही ट्रेन फुझोऊ ते क्वानझोऊ दरम्यान प्रतितास ४५० किमी वेगाने धावली. ही हाय-स्पीड ट्रेन प्रवासाचा वेळ अर्ध्याने कमी करेल. दरम्यान, समजा

चीनमधील सीआर ४५० रेल्वे भारतात धावल्यास मुंबई ते दिल्ली हे अंतर फक्त ३ तासात पार होईल. चीनने नुकतीच अल्ट्रा हायस्पीड मॅगलेव्ह ट्रेनची चाचणी केली. ही ट्रेन लो वॅक्युम पाईपलाईनमधून धावते. दरम्यान मॅगलेव्ह ट्रेन जपानमध्ये सुसाट वेगात धावत आहे.

जगातील सर्वात वेगवान ट्रेन World’s Fastest Trains: Check the full list here

जपानमध्ये धावणारी एससी मॅगलेव्ह ट्रेन ही जगातील सर्वात वेगवान ट्रेन आहे. ही ट्रेन प्रतितास ६०३ किमीचे अंतर पार करते. रेग्युलर एक्सप्रेस ट्रेनपेक्षा मेगलेव्ह ट्रेनसाठी वेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. मॅगनेटिक लेविटेटशन तंत्रज्ञानावर ही ट्रेन धावतेय. जगातील दुसरी वेगवान ट्रेनही जपानमध्येच धावते. JR Maglev MLX-01 ही जगातील दुसरी वेगवान ट्रेन आहे, या ट्रेनचा वेग प्रतितास ५८१ किमी इतका आहे. ही ट्रेन जपानमधील मोजक्याच शहरात धावते, पुढील चार वर्षात जपानमध्ये सर्वत्र ही ट्रेन चालण्याची शक्यता आहे. TGV ट्रेन ही जगातील तिसरी सर्वात वेगवान ट्रेन आहे. ही ट्रेन फ्रेंचमधून धावते. या एक्सप्रेसचा वेग ५७५ किमी प्रतितास इतका आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Shape : तुमचा चेहरा कोणत्या आकाराचा? ही ट्रिक वापरा अन् लगेच ओळखा

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

अंमली पदार्थ अन् २ बायका, फ्लॅटमध्ये रेव्ह पार्टी; खडसेंच्या जावयाला पोलिसांनी रंगेहाथ पकडलं | VIDEO

Saiyaara Box Office Collection : जगभरात 'सैयारा'ची जादू कायम, २०० कोटींच्या क्लबमध्ये केली एन्ट्री

Infertility treatment: गर्भधारणेमध्ये अडथळा येत असलेल्या महिलांसाठी 'ही' थेरेपी ठरेल आशेचा किरण; पाहा काय आहे ही थेरेपी?

SCROLL FOR NEXT