Women with Biggest Lips Saam Tv
देश विदेश

Women with Biggest Lips :अर्रर्र! सुंदर दिसण्याच्या नादात तरुणी काय करून बसली? ओठांचा आकार वाढला अन् आता हवंय खरं प्रेम

काही लोक सुंदर दिसण्यासाठी काहीही करायला तयार होतात. सुंदर दिसण्याची अशीच एक हौस एका महिलेला चांगलीच भारी पडली आहे.

Shivani Tichkule

World's Biggest Lips : आपण सुंदर दिसायला हवं असं कुणाला वाटत नाही. आता तर त्यासाठी बरेच पर्याय देखील उपलब्ध झाले आहेत. अगदी मेकअपपासून ते कॉस्मेटिक सर्जरीपर्यंत. सौंदर्याची व्याख्या वेगवेगळी असते. 

काहींना बाह्य सौंदर्य हवे असते तर काहींना आंतरिक सौंदर्य हवे असते. पण आजही जगात असे अनेक लोक आहेत ज्यांना बाह्य सौंदर्य जास्त आवडते. अशा परिस्थितीत काही लोक सुंदर दिसण्यासाठी काहीही करायला तयार होतात. सुंदर दिसण्याची अशीच एक हौस एका महिलेला चांगलीच भारी पडली आहे.  (Latest Marathi News)

सध्या सोशल मीडियावर (Social Media) एक मुलगी खूप व्हायरल (Viral) होत आहे, जिचे वर्णन जगातील सर्वात मोठे ओठ असलेली मुलगी असे केले जात आहे.सर्वात मोठे ओठ असलेल्या या मुलीचे नाव एंड्रिया एमिलोवा इवानोवा आहे आणि तिचे वय फक्त 25 वर्षे आहे. एवढ्या लहान वयात एंड्रियाने तिच्या ओठांना हायलाइट करण्यासाठी इतके फिलर्स लावले आहेत की तिचे ओठ आता फुग्यासारखे दिसायला लागले आहे. तिला याची काही अडचण नसली तरी तिच्यावर मनापासून प्रेम करणारी व्यक्ती तिला सापडत नाही.

20 लाख खर्च करून केले ओठ मोठे

वेगळं आणि सुंदर दिसण्यासाठी एंड्रियाने 8-10 नव्हे तर एकूण 43 ब्युटी प्रोसिजर केल्या आहेत आणि त्यासाठी तिने तब्बल 20 लाख रुपये खर्च केले आहेत. एंड्रियाचे ओठ जगातील सर्वात मोठे ओठ आहेत, तरीही तिला ते आणखी मोठे करायचे आहेत. ती तिच्या गालाची हाडे टोन करण्यासाठी 4 हायलुरोनिक एसिड इंजेक्शन्स देखील घेणार आहे.

आता हवं आहे खरं प्रेम

एंड्रियाचे म्हणणे आहे की, अनेक पुरुषांना तिचे दिसणे विचित्र वाटते, परंतु अनेकांना ती आवडते. तिला अनेक प्रस्ताव येतात पण ती खऱ्या प्रेमाची वाट पाहत असते. आता ती एका रिअॅलिटी शोच्या माध्यमातून तिचे प्रेम शोधणार आहे. तिचे म्हणणे आहे की, यापूर्वी अनेकदा तिचा ब्रेकअप झाला आहे. परंतु आता तिला खरं प्रेम हवं आहे ज्यांच्यासोबत तिला लग्न करायचे आहे. आता या सगळ्या गोष्टी असूनही एंड्रियाला खरे प्रेम मिळेल का हे पाहावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बदलापूर रेल्वे स्टेशनच्या पुढे मालगाडी थांबली; CSMT कडे जाणाऱ्या ट्रेन खोळंबल्या

Bhandara Rain : भंडाऱ्याला मुसळधार पावसाने झोडपले; घरात शिरले पाणी, जीवनोपयोगी साहित्याची नासाडी

Pune : पुण्यात पावसाचे रौद्ररूप, लोणीमध्ये घरा-दारात पाणी, संसार बुडाला, लोकांच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा | पाहा VIDEO

Pitru Paksha 2025: पितृपक्षात वरणभातासोबत कोणते पदार्थ ठेवावे?

Couple Gemini Photo: जोडीदारासोबत रेट्रो लूक करायचाय? पण जमत नाही, ट्राय करा 5 ट्रेडिंग Prompt

SCROLL FOR NEXT