Chhattisgarh News Update : छत्तीसगडमधील जांजगीर-चंपा जिल्ह्यात नववीच्या विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मलखरोडा ब्लॉकमधील किरारी गावातील ही घटना आहे. परीक्षेत नापास झाल्याने विद्यार्थ्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. (Latest Marathi News)
त्याचवेळी आत्महत्या करण्यापूर्वी विद्यार्थ्याने झाडावर चढून एक व्हिडिओ बनवला होता. त्यानंतर त्याने त्याच झाडाला गळफास घेऊन मृत्यूला कवटाळले. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
गणपत रात्रे असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून, तो मालखरोडा येथील किरारी गावात राहत होता. घटनेच्या दिवशी विद्यार्थी घरात एकटाच होता. त्यांचे नातेवाईक नोकरीसाठी परराज्यात गेले होते.
परीक्षेत नापास झाल्यामुळे विद्यार्थ्याने गावाबाहेरील एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच मालखरोडा पोलीस (Police) घटनास्थळी दाखल झाले असून तपास करत आहेत. जीव देण्यापूर्वी गणपतने आपल्या मोबाईलमध्ये एक व्हिडिओ बनवला होता ज्यामध्ये त्याने हे जग सोडल्याचे कारण सांगितले आहे. या व्हिडिओमध्ये (Video) विद्यार्थी म्हणत आहे की, मला आता या जगात राहायचे नाही.
मुलाच्या आत्महत्येमुळे त्याचे आई-वडील आणि कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. परीक्षेत नापास झाल्यामुळे १५ वर्षीय गणपतने आत्महत्येसारखे भयंकर पाऊल उचलल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी मृत विद्यार्थ्याच्या नातेवाईकांचीही चौकशी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.