Patiala Gurudwara Firing Saam TV
देश विदेश

Patiala Gurudwara Firing: गुरुद्वाराजवळ दारु पित होती महिला, गोळ्या झाडून केली हत्या

Punjab Police: या प्रकरणी पोलिसांनी पटियालाच्या अर्बन इस्टेटमध्ये राहणाऱ्या आरोपी निर्मलजीत सिंह सैनी याला अटक केली.

Priya More

Punjab News: पंजाबच्या (Punjab) पटियाला जिल्ह्यात एका महिलेची गोळ्या झाडून निर्घृण हत्या (Patiala Gurudwara Firing) करण्यात आली आहे. रविवारी रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली. दुख निवारण साहिब गुरुद्वार परिसरातील संकुलात ही महिला दारु पित बसली होती. त्याचवेळी तिची हत्या करण्यात आली. परमिंदर कौर (33 वर्षे) असं या हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.

प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, गुरुद्वारा परिसरातल्या तलावाच्या काठावर ही महिला दारु पित बसली होती. गुरुद्वाराच्या सेवकांनी या महिलेला दारु पिण्यास मनाई केली. तर या महिलेने दारुची बॉटल फोडून सेवकाच्या हातावर मारली. त्याचदरम्यान घटनास्थळी मोठी गर्दी झाली. त्यानंतर या महिलेला गुरुद्वाराच्या प्रबंधक कार्यालयामध्ये नेण्यात आले. त्याचवेळी गर्दीमध्ये उभ्या राहिलेल्या एका व्यक्तीने स्वत:जवळ असलेली बंदूक काढून या महिलेवर गोळ्या झाडल्या. आरोपीने महिलेवर पाच गोळ्या झाडल्या. यामधील तीन गोळ्या महिलेला लागल्या.

गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या हत्या प्रकरणाचा तपास सुरु केला. या प्रकरणी पोलिसांनी पटियालाच्या अर्बन इस्टेटमध्ये राहणाऱ्या आरोपी निर्मलजीत सिंह सैनी याला अटक केली. आरोपी हा प्रॉपर्टी डीलर असून तो रोज गुरुद्वारा साहिबमध्ये यायचा. या गोळीबारात सागर मल्होत्राही जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर आहे.

पटियाला एसएसपी वरुण शर्मा यांनी सांगितले की, आरोपीला अटक केल्यानंतर त्याच्याकडील शस्त्रही जप्त करण्यात आले आहे. आरोपीने कोणत्या कारणासाठी महिलेवर गोळ्या झाडल्या या मागचे कारण अद्याप समजू शकले नाही. पोलिसांकडून आरोपीची कसून चौकशी सुरु आहे. पोलिसांकडून गुरुद्वारा परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे. या प्रकरणाचा पटियाला पोलिसांकडून तपास सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Wari : लंडनमध्ये हरिनामाचा जयघोष; २२ देशातून १८ हजार किलोमीटरचा प्रवास, पंढरीची वारी पोहोचली लंडनला

Moong Dal Paratha Recipe : पावसाळ्यात खा गरमा गरम अन् मऊ लुसलुशीत मूग डाळ पराठा

Accident News : सून घरी येण्याचा आईला आनंद, नजर उतरवून लेकराला पाठवलं; भीषण अपघातात नवरदेवासह ८ जणांचा अंत

Maharashtra Live News Update: 22 देशातून 18 हजार किलोमीटरचा प्रवास 70 दिवसात करत पंढरीची वारी पोहोचली लंडनला

Kasara waterfall: मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहेत हे सुंदर धबधबे; One Day पिकनीक नक्की करा

SCROLL FOR NEXT