CCTv Footage Saam TV
देश विदेश

CCTV Footage : आधी गाडीने तिघांना उडवलं, नंतर लोकांसोबत घातला वाद; उत्तर प्रदेशमधील माय-लेकीचा VIDEO Viral

Viral Video : अपघातानंतरचा संपूर्ण व्हिडीओ तेथे बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Uttar Pradesh News :

यूपीच्या ग्रेटर नोएडामध्ये एका महिलेने सोसायटीच्या गार्डसह तीन जणांच्या अंगावर कार घातली. या अपघातात तिघेही जखमी झाले. यावेळी घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती. लोकांनी घटनेचा जाब विचारला त्यावेळी महिला आणि तिच्या मुलीने लोकांशी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. तिन्ही जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना महिलेने गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

अपघातानंतरचा संपूर्ण व्हिडीओ तेथे बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. काळ्या रंगाची होंडा सिटी कार सोसायटीच्या गेटवर येते आणि समोरून आत येण्याऐवजी गार्ड रूमच्या दिशेने वळल्याचे व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.

मंगळवारी दुपारी झालेल्या या अपघातात गेटवर बसलेले सुरक्षा रक्षक, डिलिव्हरी बॉय आणि आणखी एकजण जखमी झाला आहे. तिन्ही जखमींना तेथे उपस्थित लोकांनी रुग्णालयात दाखल केले आहे. त्याचवेळी गाडीतून खाली उतरलेल्या महिलेने आपली चूक मान्य न करता गोंधळ घालण्यास सुरुवात केली. (Latest Marathi News)

उपस्थित लोकांनी महिलेला जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यास सांगितले. यावर महिलेने गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. उलट ती लोकांवर ओरडू लागली. जखमींची एवढी काळजी असेल तर तुम्ही त्यांना उपचारासाठी घेऊन जा. माहितीनुसार, तिघेही किरकोळ जखमी झाले आहेत.या महिला आणि तिच्या मुलीचा भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या प्रकरणी एफआयआर नोंदवून कारवाई करण्यात येत आहे , असं पोलिसांचे म्हणणे आहे. वाहन जप्त करून पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून एफआयआर नोंदवून कारवाई करण्यात येत आहे. (Maharashtra News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नंदुरबार बाजार समितीत टोमॅटोची आवक घटल्याने भाव दुप्पट

Akola : पाण्यात पडलेल्या बकरीला वाचविले पण जीव गमावला; नदीतील डबक्यात बुडून एकाचा मृत्यू

Vasai - Virar MSRTC : कर्मचाऱ्यांना पगार नाही, वसई-विरार मनपाची बससेवा ठप्प; ऐन गणेशोत्सवात नागरिकांना मनस्ताप

Ladki Bahin Yojana: लाडकींमुळे आमदारांचा निधी रखडला? ९ महिन्यांपासून १ रुपयाही मिळाला नाही; मंत्रालयात हेलपाटे

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात वाढ; १७०० कोटी मंजूर

SCROLL FOR NEXT