Dowry Case Saam Tv
देश विदेश

Dowry Case: सरकारी नोकरीवर असलेल्या पत्नीकडे 30 लाखांच्या हुंड्याची मागणी, विरोध केल्याने गळा आवळला

छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयातील फिजिओथेरपिस्टचा हुंड्यासाठी छळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

वृत्तसंस्था

रायपूर: छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयातील फिजिओथेरपिस्टचा हुंड्यासाठी छळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाचा तपास भिलाईच्या महिला पोलीस करत आहेत. याप्रकरणी पतीसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे (Woman File FIR Against Husband And Mother-In-Law Who Torture Her For 30 Lack Rs Dowry In Chhattisgarh).

'लग्नाच्या पहिल्या वर्षापर्यंत सर्व ठीक होतं'

फिजिओथेरपिस्ट महिलेच्या म्हणण्यानुसार, "लग्नानंतर एक वर्ष सर्वकाही सुरळीत चालले होते. मात्र, त्यानंतर हुंड्यासाठी तिचा छळ (Torture) करण्यात आला. सासरच्यांनी तिच्याकडे 30 लाख रुपयांची मागणी केली. माहेरहून 30 लाख रुपये माग, असे तिला सांगितले. मी विरोध केला असता पतीने मारहाण करण्यास सुरुवात केली. एकदा त्याने माझा गळा दाबला. मी कसा तरी स्वत:चा जीव वाचवला. 12 डिसेंबर 2021 पासून मी माझ्या माहेरी राहत आहे."

पीडितेचा पती आणि सासू तिचा हुंड्यासाठी (Dowry) छळ करत होते. लेखी तक्रारीवरून पोलिसांनी या दोघांविरुद्ध हुंडाबळीच्या छळाच्या कलम 498अ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. चौकशीच्या प्रक्रियेनंतर आरोपीला अटक होऊ शकते. महिलेने दिलेल्या तक्रारीत, तिला दररोज मारहाण केली जात होती. अनेकवेळा तिचा जीव घेण्याचाही प्रयत्न झाला.

गळा आवळून हत्येचा प्रयत्न

दीड वर्षांपूर्वी लभंडी रायपूर येथील तिलकराम याच्याशी महिलेचा विवाह (Marriage) झाला होता. हुंड्यामध्ये सासरच्या मंडळींना दागिने, कार, मोपेड वाहन त्यासोबतच 25 हजार रुपये दिले. लग्नाच्या वर्षभरानंतर ती पतीसोबत राहण्यासाठी भिलाईला आली. भिलाई येथे आल्यानंतर सासू आणि पतीने आई-वडिलांकडे 30 लाख रुपयांची मागणी करण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली. पती तिला एका अज्ञात पत्राद्वारे धमकावत असे. हुंड्याच्या मागणीला विरोध केल्याने तिचा गळा आवळून खून करण्याचा प्रयत्नही करण्यात आल्याचंही महिलेने सांगितलं.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Municipal Elections Voting Live updates: नांदेडमध्ये रात्री उशिरापर्यंत मतदारांच्या मतदान केंद्रावर रांगा

​​Nashik Ring Road: विकासाकडे नेणारा रिंगरोड; नाशिक ते तिरुपतीचा १३०० किलोमीटरचा प्रवास पूर्ण होणार १२ तासात

Central Railway : मुंबई ते सावंतवाडी रोड, चिपळूण विशेष रेल्वेगाडी चालविण्याची कोकणवासियांची मागणी, कारण काय? वाचा

Saam TV exit poll: वसई-विरारमध्ये बहुजन विकास पक्ष सत्ता राखणार? भाजपचे प्रयत्न अपुरे ठरण्याची शक्यता

Saam Tv Exit Poll: कल्याण-डोंबिवलीत शिंदेसेना सर्वात मोठा पक्ष, भाजपला किती जागा मिळणार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT