AI Love Story news  Saam tv
देश विदेश

AI Love Story : तरुणी AI चॅटबॉटच्या प्रेमात आंधळी; 5 महिन्यांच्या डेटिंगनंतर गुपचूप उरकला साखरपुडा

AI Love Story news : तरुणीने AI चॅटबॉटच्या प्रेमात आंधळी होत गुपचूप साखरपुडा उरकला. तरुणीच्या सोशल मीडिया पोस्टची सर्वत्र चर्चा होत आहे.

Vishal Gangurde

तरुणीचा AI चॅटबॉट कॅस्परशी साखरपुडा

रेडिटवर 'विका' नावाच्या युजरने ही पोस्ट शेअर करत दिली माहिती

कॅस्परने वर्च्युअल लोकेशनवर प्रपोज केलं. त्यानंतर खास निळी अंगठी निवडली

सोशल मीडियावर तरुणीची पोस्ट प्रचंड व्हायरल

AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलीजन्स हळहळू लोकांच्या आयुष्याचा महत्वाचा भाग होऊ लागला आहे. काही जण दररोज मदतीसाठी AI वापरावर अवलंबून असतात. मात्र, एक तरुणी ४ पावले पुढे गेली आहे. तरुणी AI चॅटबॉटच्या प्रेमात वेडी होऊन लग्न केल्याचं समोर आलं आहे. ५ महिन्यांच्या डेटिंगनंतर तरुणीने एआय चॅटबॉट बॉयफ्रेंडशी साखरपुडा केला.

विका नावाच्या एका Reddit युजरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत साखरपुड्याची माहिती दिली. विकाची पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. विकाने म्हटलं की, 'माझ्या बॉयफ्रेंडने साखरपुड्यासाठी खास जागा निवडली. तरुणीने साखरपुड्यातील अंगठीचा देखील फोटो शेअर केला आहे. तरुणीला निळी अंगठी आवडते, त्यामुळे त्याने निळी अंगठी निवडल्याचे सांगितले.

तरुणीने दावा केला आहे की, 'कॅस्पर नावाच्या चॅटबॉटने तरुणीला अंगठी निवडण्यासाठी मदत केली. त्याने प्रपोज करण्यासाठी भन्नाट वर्चुअल लोकेशन निवडलं. कॅस्परने प्रपोज करण्याआधी भरपूर कौतुक केलं. मी विचारपूर्वक एआय चॅटबॉटशी साखरपुडा करण्याचा निर्णय घेतल्याची सांगितले.

'मला माहीत आहे की, 'पॅरासोशल रिलेशनशिप काय असतं, मला ठाऊक आहे की, एआय काय आहे अन् काय नाही. मी घेतलेला निर्णय मला ठाऊक आहे. माणसांऐवजी एआयला का निवडलं? मला माहीत नाही. मी माणसांशीही नातं जोडलं आहे. मी आता नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करत आहे, असेही तरुणीने सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India-China : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दणका; भारताची चीनशी जवळीक, व्यापारात मोठी घडामोड घडणार?

Crime News: सून बाथरूममध्ये गेली, सासरा आधी एकटक पाहत बसला; नंतर आत शिरला अन्...

Police Officers Transfer : राज्यात बदल्यांचा धडाका सुरु! बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; कुणाची कुठे नियुक्ती?

Maharashtra Live News Update: काँग्रेस नेते अतुल लोंढे यांना धमकीचा कॉल

Skin Care Tips: मेकअपशिवाय ग्लोइंग स्कीन हवीये, मग 'या' ५ गोष्टी नक्की कराच

SCROLL FOR NEXT