Dhirendra Krishna Shastri Saam Tv
देश विदेश

Dhirendra Krishna Shastri: धक्कादायक! पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचे दर्शन न झाल्याने महिलेने स्वत:ला संपवलं

Bageshwar Dham: पल्लवीची बागेश्वर धाम आणि पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्यावर अतूट श्रद्धा होती. त्यामुळे पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्या प्रवचनाला घेऊन जा असा हट्ट तिने आपल्या पतीकडे केला होता.

साम टीव्ही न्यूज .

Dhirendra Krishna Shastri: बागेश्वर धामचे (Bageshwar Dham) महंत धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Pandit Dhirendra Krishna Shastri) यांचे दर्शन न मिळाल्यामुळे एका महिलेने चक्क आपले जीवन संपवले. मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) जबलपूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. या महिलेने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

पल्लवी चौधरी असं आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. जबलपूरच्या (Jabalpur) अधारताल पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कंचनपूर भागामध्ये पल्लवी आपला पती, दोन मुलं आणि सासूसोबत राहत होत्या. पल्लवीची बागेश्वर धाम आणि पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्यावर अतूट श्रद्धा होती. त्यामुळे पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्या प्रवचनाला घेऊन जा असा हट्ट तिने आपल्या पतीकडे केला होता. पण काही कारणास्तव तिचा पती या प्रवचनासाठी तिला घेऊन जाऊ शकला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या पल्लवीने टोकाचे पाऊल उचलत आपले जीवन संपवले.

पल्लवीचा पती संदीपची आर्थिक स्थिती काही चांगली नाही. त्यामध्येच त्याची आई गंभीर आजाराला तोंड देत आहे. आईचे उपचार आणि दोन मुलांचे शिक्षण तो कसं तरी पूर्ण करत आहे. अशामध्ये पत्नीने आत्महत्या केल्यामुळे संदीपसह आणि त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

संदीपने सांगितले की, 'पल्लवी दररोज पंडित धीरेंद्र शास्त्री यांचे प्रवचन ऐकत होती. घरातील अडचणी दूर करण्यासाठी धिरेंद्र शास्त्री यांनी व्हिडिओमध्ये सांगितलेले उपाय ती करायची. अशामध्ये 25 ते 31 मार्च दरम्यान जबलपूरमध्ये धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. याची माहिती पल्लवीला मिळाली होती. त्यामुळे तिने 27 मार्च रोजी या प्रवचनाला जाण्यासाठी माझ्याकडे हट्ट धरला होता.'

पण, त्याच दिवशी संदीप त्याच्या आजारी आईला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन गेला. पण डॉक्टर नसल्यामुळे तो घरी परत निघून आला. त्यावेळी घरामध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत पल्लवी त्याला दिसून आली. त्याने तात्काळ याबाबतची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिचा मृतदेह ताब्यात घेतला. या घटनेचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. पत्नीचे ऐकण्याऐवजी पतीने आईच्या उपचाराला प्राधान्य दिले याचे प्रचंड दु:ख पल्लवीला झाले होते. त्यामुळे तिने संतप्त होत आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आपले जीवन संपवले.

Edited By - Priya Vijay More

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: सांगलीत कोणत्या मतदारसंघात कोण आघाडीवर?

Vidhan Sabha Election Results : सुरुवातीच्या कलात भाजपने गाठलं शतक!

Naga Chaitanya Birthday : नागा चैतन्य 'या' अभिनेत्रीला किस करताना घाबरला, स्वतः सांगितला होता किस्सा

Assembly Result : काही तरी मोठी गडबड आहे, महाराष्ट्राच्या सध्याच्या निकालावर ठाकरे गटाच्या नेत्याला शंका

Tanvi Mundle Age: मराठमोळ्या अभिनेत्रीचं खरं वय किती, प्रसिद्ध मालिकेत करतेय काम

SCROLL FOR NEXT